शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जिहे-कठापूर, म्हसवड एमआयडीसीबाबत पंतप्रधानांकडे साकडे, मंत्री जयकुमार गोरेंनी घेतली नरेंद्र मोदींंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:42 IST

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान..

सातारा : नवी दिल्ली येथे महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्रीजयकुमार गोरे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत जिहेकठापूर आणि उरमोडी पाणी योजना, म्हसवड एमआयडीसी तसेच राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या मंजुरी व मंजूर प्रकल्पांच्या कामांना गती देण्याविषयी सविस्तर चर्चा झाली. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर उपस्थित होते.पंतप्रधानांबरोबर झालेल्या भेटीत माण-खटाव मतदारसंघातील म्हसवड येथील औद्योगिक वसाहतीला राज्यशासनाने मंजुरी देऊन जमीन अधिग्रहणासाठी एक हजार कोटींची तरतूद केली आहे. या औद्योगिक वसाहतीला केंद्राकडून ग्रीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर दर्जा मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर योजनेच्या वाढीव कामांना राज्यशासनाने २०२४ मध्ये मान्यता दिली आहे. उरमोडी योजनेच्या कामांचीही सुधारीत किंमत ३,०४२ कोटी ठरविण्यात आली आहे. या योजनेची निम्मी कामे झाली असली तरी उर्वरित कामांसाठी केंद्राच्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे जिहे कठापूर आणि उरमोडी वाढीव योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत घेऊन निधीची तरतूद करण्याबाबत पंतप्रधान मोदींबरोबर चर्चा करण्यात आली. नव्याने निर्माण होत असलेल्या मुंबई-बंगळुरू महामार्गालगत खटाव तालुक्याजवळ एअरस्ट्रीप उभारणीचे प्रयोजन आणि त्याबाबत कार्यवाहीची चर्चा करण्यात आली.फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग लवकरात लवकर भरीव निधीसह पूर्ण होणे गरजेचे असल्याने त्या कामाला गती देण्याविषयी पंतप्रधानांबरोबर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री गोरे आणि माजी खासदार नाईक-निंबाळकर यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित विकासकामांना तातडीने गती देण्याचे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान..ग्रामविकास मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जयकुमार गोरे यांची पंतप्रधानांसोबत ही पहिलीच भेट होती. या भेटीत त्यांनी दि. १७ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविणार असल्याचे सांगितले. योजनेच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली.