जिल्ह्यात साखर उत्पादनाची कोटी क्विंटलकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:38 IST2021-03-21T04:38:54+5:302021-03-21T04:38:54+5:30
वाठार स्टेशन : जिल्ह्यातील सोळापैकी पंधरा कारखान्यांचे गाळप वेगाने सुरू आहे. या हंगामात जरंडेश्वरने सर्वाधिक १२ लाख ४५ हजार ...

जिल्ह्यात साखर उत्पादनाची कोटी क्विंटलकडे वाटचाल
वाठार स्टेशन : जिल्ह्यातील सोळापैकी पंधरा कारखान्यांचे गाळप वेगाने सुरू आहे. या हंगामात जरंडेश्वरने सर्वाधिक १२ लाख ४५ हजार १७० मेट्रिक टन गाळप करीत १४ लाख ७ हजार ६०० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. त्यापाठोपाठ कृष्णा कारखान्याने १२ लाख ५६ हजार २४० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात १९ मार्चअखेर जिल्ह्यात ८७ लाख ८७ हजार ९२३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, ९७ लाख ८८ हजार ८६६ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
मागील वर्ष सोडता सलग दोन वर्षांत शंभर लाख क्विंटल साखरेचे उत्पादन जिल्ह्यात झाले होते. या तुलनेत यंदाही साखर उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. या वर्षीही शंभर लाख क्विंटल साखरेचे उत्पादनाचा टप्पा सहज पार होणार आहे.
एका बाजूने साखर उत्पादन वाढत असताना दुसऱ्या बाजूने मात्र शेतकऱ्याला ऊस दर देण्याबाबतीत अनेक कारखाने उदासीन आहेत. एकरकमी एफआरपी दर देण्याची मानसिकता अनेक कारखानदारांची दिसत नाही. दोन ते तीन टप्प्यांत एफआरपी देण्यासाठी कारखान्यानी शेतकऱ्यांना बांधून घेतलं आहे.
जिल्ह्यात १९ मार्चअखेर श्रीराम जवाहर कारखान्याने ५ लाख ५ हजार ८०० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. न्यू फलटण साखरवाडीने ५ लाख २२ हजार ४२० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. शरयू शुगरने ७ लाख २९ हजार ८०० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. स्वराज इंडिया फलटणने ५ लाख ४४ हजार १५ लाख क्विंटल, जरंडेश्वर शुगरने १४ लाख ७ हजार ६०० लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
जयवंत शुगरने ६ लाख २८ हजार १५० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. कृष्णाने १२ लाख ५६ हजार २४० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सह्याद्रीने १२ लाख ५० हजार ३६० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. रयत कारखान्याने ५ लाख ३८ हजार १७० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने २ लाख ४ हजार ३० मेट्रिक टन उसाचे गाळप करीत २ लाख ४४ हजार ६२५ लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. अजिंक्यतारा कारखान्याने ६ लाख ४० हजार ६८० लाख मेट्रिक टन उत्पादित केली आहे.
किसन वीर साखर कारखान्याने ३ लाख ५६ हजार ४१० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे, तर नुकताच किसनवीर कारखान्याचा खंडाळा कारखान्याने २ लाख ७१ हजार १०० मेट्रिक टन गाळप करीत १ लाख ७० हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे, तर मागील वर्षीची एफआरपी न दिल्याने प्रतापगड कारखाना बंद आहे.
चौकट :
दुष्काळी तालुकेही अग्रेसर
माण खटाव तालुक्यातील ग्रीन पॉवर शुगरने ५ लाख ४० हजार ३५० लाख क्विंटल, खटाव माण कारखान्याने ६ लाख ७१ हजार ०९६ लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.