सैनिकी शाळेतून देशाला शेकडो नररत्ने!
By Admin | Updated: November 21, 2015 00:21 IST2015-11-20T23:20:23+5:302015-11-21T00:21:08+5:30
साताऱ्याची शान : कर्नल संतोष महाडिक यांच्या हौतात्म्यामुळे शाळेच्या देदीप्यमान कारकिर्दीकडे पुन्हा वेधले नागरिकांचे लक्ष--सलाम सातारा-एक

सैनिकी शाळेतून देशाला शेकडो नररत्ने!
प्रगती जाधव-पाटील-- सातारा सैन्यात अधिकारीपदावर पोहोचण्यासाठी कोणताही अडथळा येऊ नये आणि निव्वळ अव्वल गुणवत्तेवरच निवड व्हावी, या हेतूने स्थापन झालेल्या देशातील पहिल्या सैनिक शाळेने देशाच्या सेवेसाठी हजारो अधिकारी दिले आहेत. वायू दलातील सर्वोच्च पदावर सातारा सैनिक स्कूलचे पी. व्ही. नाईक एअर चिफ मार्शल म्हणून विराजमान झाले होते. या बरोबरच लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, कॅप्टन आदी पदांवर सातारा सैनिक स्कूलचे शेकडो विद्यार्थी कार्यरत आहेत. देशसेवेसाठी नररत्न तयार करणारी ही शाळा सातारवासीयांची शान आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोगरवाडीचे कर्नल संतोष महाडिक सैनिक स्कूलचे विद्यार्थी. त्यानिमित्ताने शाळेने दिलेल्या रत्नांचा ‘लोकमत’ने आढावा घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी सातारा सैनिक स्कूलच्या स्थापनेचा प्रस्ताव ठेवला. देशातील कानाकोपऱ्यातून सैनिकी शिस्तीत वाढण्यासाठी, त्यांना घडविण्यासाठी एक निवासी शाळा असावी, अशी ती संकल्पना होती. त्यानुसार मसुदा ठरवून देशातील पहिली निवासी मुलांची शाळा म्हणून सैनिक स्कूलची स्थापना करण्यात आली. पाचवीत स्पर्धा परीक्षा घेऊन सहावीत निवासी शाळेत प्रवेश मिळविण्याची संकल्पना २३ जून १९६१ रोजी सत्यात उतरली. त्यानंतर या शाळेने कधीच मागे वळून पाहिले नाही. देशसेवेचा ध्यास, देशासाठी समर्पित भाव आणि सोबतीला सैनिकी शिस्त अशा त्रिकुटात तयार होणारे विद्यार्थी संरक्षण क्षेत्रात आघाडीवर पोहोचले. सकाळी साडेसहा वाजता सुरू होणारी सैनिकी दिनचर्या रात्री साडेदहा वाजता संपते. शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी आहे. पालकांना भेटण्याचा आणि विद्यार्थ्यांना शाळेबाहेर सोडण्याचे वारही निश्चित करून दिलेले आहेत. या व्यतिरिक्त या मुलांना पूर्णवेळ केवळ सैनिकी शिस्तीच वावरावे लागते. हीच शिस्त त्यांना पुढील काळात उपयुक्त ठरते. पी. आर. गंगाधरन, ए. पी. गरुड, रवींद्र थोडगे, रावीज कानिटकर, आर. आर. निंभोरकर मेजर जनरल : एस. एन. राजन, एजेएस लांबा, पी. के. चक्रवर्ती, ताजुद्दीन म्हैसळे, एम. एन. काशीद, शिशिर महाजन, के. ओ. ठाकरे, अजितकुमार मुधोळकर, सुनील भोकरे, मिलिंद भुरके, विजय पिंगळे ब्रिगेडियर संजय होले, विवेक टोळे, संपतराव पाटील, अरविंद कुंडलकर, शशांक दहात, भालचंद्र पाटील, श्रीनिवास यारगुप, जगदीशचंद्र बागुल, सूर्यकांत जाधव, पृथ्वीराज पाटील, विजयकुमार चव्हाण, रामचंद्रन संगम, सुहास धर्माधिकारी, प्रकाश चौधरी, एच. एन. म्हैसळकर, प्रदीप नायर, आर. व्ही. देसाई, जगदीश चौधरी, मंगेश निकम, आर. के. गायकवाड, आर. के. भालसिंग, सुनील बोधे, शिरीष ढोबळे, व्ही. के. पिंगळे, एस. एन. वासाडे, ए. जी. पाटील, राजेंद्र माने, व्ही. बी. शिरकांडे. सेनेतील वीरपदक प्राप्त विद्यार्थी प्रदीप ताथवडे, सुनील भोकरे, सचिन निंबाळकर, एम. एम. देशपांडे, सचिन रणदाले, प्रकाश नवले, ए. पी. गरुड, रवींद्र थोडगे, एस. एन. राजन, एजेएस लांबा, पी. के. चक्रवर्ती, आर. आर. निंभोजकर, शिशिर महाजन, के. ओ. ठाकरे, सुभाष पाटील, के. सी. मुख्ती, संजीव भोईटे, विनोद शिरकांडे, के. गुराओ, संजय होले, पी. डी. कुलकर्णी.