शेंद्रे येथे मायलेकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST2021-03-22T04:35:29+5:302021-03-22T04:35:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: तालुक्यातील शेंद्रे येथे मायलेकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

Milekas beaten at Shendre | शेंद्रे येथे मायलेकास मारहाण

शेंद्रे येथे मायलेकास मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा: तालुक्यातील शेंद्रे येथे मायलेकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश मोहिते, खाशाबा मोहिते, मनोज मोहिते, संतोष मोहिते अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, हर्षद हणमंत जाधव (वय २२, रा. शेंद्रे, ता. सातारा) हा खासगी नोकरी करतो. त्याच्या घराचे वीज कनेक्शन तोडले होते. मात्र, त्यांनी बिल भरले असल्यामुळे कट केलेले कनेक्शन जोडून देण्यात यावे म्हणून शेजारीच राहणाऱ्या सुरेश मोहिते यांच्या घरी तो गेला. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाल्यामुळे खाशाबा मोहिते, मनोज भीमराव मोहिते, संतोष हणमंत मोहिते या तिघांनी हर्षद यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली. यावेळी मनोज मोहिते याने हर्षद यांच्या पायावर दगड फेकून मारला. यावेळी हर्षद यांची आई गीता यांना मनोज याने हाताने ढकलून दिले. यामध्ये गीता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून गहाळ झाले.

अधिक तपास पोलीस हवालदार रामदास भोईटे करत आहेत.

Web Title: Milekas beaten at Shendre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.