बुध ग्रामपंचायत कायम उजेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST2021-03-23T04:41:48+5:302021-03-23T04:41:48+5:30

पुसेगाव : खटाव तालुक्यातील बुध गावच्या ग्रामसचिवालय इमारतीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, भू-संपादन विभागाची कार्यालये, गाळे तसेच गावकामगार तलाठी व ...

Mercury Gram Panchayat in perpetual light | बुध ग्रामपंचायत कायम उजेडात

बुध ग्रामपंचायत कायम उजेडात

पुसेगाव : खटाव तालुक्यातील बुध गावच्या ग्रामसचिवालय इमारतीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, भू-संपादन विभागाची कार्यालये, गाळे तसेच गावकामगार तलाठी व मंडलाधिकारी कार्यालय आहेत. या सर्व कार्यालयांचे वीजबिल महिना अखेरीस तीन-चार हजारांवर येत असे.

ग्रामीण भागात भारनियमनाचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे लोकांना सरकारी दाखले मिळण्यास विलंब होत असे. यावर उपाय म्हणून सरपंच अभयसिंह राजेघाटगे आणि राज्याचे वित्त विभागाचे उपसचिव वैभव राजेघाटगे याच्या संयुक्त प्रयत्नाने ऊर्जा विभाग अंतर्गत सौरऊर्जाचे युनिट बसविण्यात आले आहे. एमइटीएअंतर्गत या योजनेनुसार पाच किलोव्हॅट क्षमता असलेला पाच लाख किमतीचे हे युनिट १०० टक्के अनुदानित आहे. यामुळे ग्रामपंचायतीचा वार्षिक साठ हजार फायदा झाला आहे. तसेच सौरऊर्जा ही एक शाश्वत ऊर्जा असल्यामुळे नागरिकांना दाखले व अन्य कामांसाठी आता लाईटची वाट पाहात बसावे लागणार नाही. कारण आता बुध ग्रामपंचायत कायम उजेडात राहणार आहे. या कामासाठी सरपंच अभयसिंह राजेघाटगे, उपसरपंच मनीषा कुंभार, ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी परिश्रम घेतले असून, संपूर्ण खटाव तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे. कारण बुध ग्रामपंचायत ही खटाव तालुक्यातील पहिलीच पारेषणमुक्त ग्रामपंचायत आहे. तसेच यापुढील काळात बुध गावासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सरपंच यांनी सांगितले.

Web Title: Mercury Gram Panchayat in perpetual light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.