शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

शिक्षक बँकेची नोकरभरती रद्द करावी, सभासदांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:58 IST

शिक्षक बँकेत होऊ घातलेल्या ३७ कर्मचाऱ्यांच्या नोकरभरतीमध्ये सत्ताधारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या मुलांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिक्षक बँकेची निवडणूक दहा महिन्यांवर आलेली असताना अनावश्यक नोकरभरती रद्द करावी, अशी मागणी राजेश बोराटे, धनसिंग सोनावणे यांच्यासह शिक्षक सभासदांनी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देशिक्षक बँकेची नोकरभरती रद्द करावी, सभासदांची मागणी सातारा जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार

सातारा : शिक्षक बँकेत होऊ घातलेल्या ३७ कर्मचाऱ्यांच्या नोकरभरतीमध्ये सत्ताधारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या मुलांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिक्षक बँकेची निवडणूक दहा महिन्यांवर आलेली असताना अनावश्यक नोकरभरती रद्द करावी, अशी मागणी राजेश बोराटे, धनसिंग सोनावणे यांच्यासह शिक्षक सभासदांनी पत्रकार परिषदेत केली.राजेश बोराटे म्हणाले, शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाची सभा ३० जून रोजी झाली. या सभेत ठराव करून विद्यमान चेअरमन व संचालकांनी बँकेत नोकरभरती करण्याचा घाट घातला आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०१३ मध्ये नोकरभरती झालेली होती. त्यावेळी ही नोकरभरती अनावश्यक असल्याचे सांगून तत्कालीन विरोधक व सध्याचे सत्ताधाऱ्यांनी बँकेच्या वार्षिक सभेत गोंधळ घातला होता.

निवडणुकीनंतर बँकेत सत्तेवर आल्यावर विद्यमान सत्ताधाऱ्यांनी २०१३ मध्ये झालेली भरती अनावश्यक असल्याचा ठराव केला. २०१३ मध्ये नोकरीस लागलेल्या २६ कर्मचाऱ्यांना २०१७ मध्ये कामावरून काढून टाकले.

या विरोधात त्या कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यावर सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी २०१३ची भरती अनावश्यक असल्याचे न्यायालयातही सांगितले. न्यायालयानेही बँकेचे म्हणणे ग्राह्य धरले. यानंतर बँकेच्या नोकरीतून काढून टाकलेल्या २३ कर्मचाऱ्यांना २०१८ मध्ये परत बँकेच्या नोकरीवर घेतले. यामध्ये आर्थिक तडजोड झाली असण्याची श्क्यता आहे.सध्या डिजिटायझेशनचे युग असल्याने बँकेत कमीत कमी सेवकांवर बँक चालवणे सोपे झाले आहे. यामुळे व्यवस्थापक खर्चातही बचत होत आहे. आत्ता बँकेत होऊ घातलेल्या ३७ कर्मचाऱ्यांच्या नोकरभरतीमध्ये विद्यमान संचालक, माजी चेअरमन व संचालक, सत्ताधारी संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची निवड होण्याची दाट शक्यता आहे.

या नोकरभरतीमुळे बँकेला फार मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. यामुळे सभासदाला जादा दराने व्याज भरावे लागणार आहे. नोकरभरती न केल्यास व्यवस्थापन खर्चात बचत होऊन बँकेच्या कर्जाचे व्याजदर कमी करणे शक्य होणार आहे.यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली असल्याची माहितीही बँकेच्या सभासदांनी दिली. शिक्षक बँकेचे सभासद गणपत बनसोडे, मारूती ढगे, आनंदराव सोनवलकर, राजेंद्र कर्णे, सुरेश नाळे, संजय भोसले, आबिद भालदार यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :jobनोकरीSatara areaसातारा परिसर