शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस, सरकार काय तोडगा काढणार?
3
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
4
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
5
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
6
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
7
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
8
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
9
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
10
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
11
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
12
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
13
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
14
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
15
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
16
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
17
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
18
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
19
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
20
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!

सदस्य म्हणतात सभा झेडपीतच घ्या !, शासन पत्र व्हीसीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 18:07 IST

Coronavirusunlock, zp, sataranews कोरोनामुळे शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सभा व्हीसीद्वारे सुरू आहेत. मात्र, प्रश्नांची सोडवणूक होत नाही व विषय अर्धवट राहत असल्याने सर्वसाधारण सभातरी झेडपीतच घेण्यासाठी सदस्य आता आक्रमक झाले आहेत. बाजार सुरू झाले, शाळांची घंटा वाजली, मंदिरे उघडली. मग, कमी संख्या असणारी सभाच झेडपीत का नको असा सवालही सदस्य करु लागले आहेत.

ठळक मुद्देसदस्य म्हणतात सभा झेडपीतच घ्या !, शासन पत्र व्हीसीचे बाजार, शाळा सुरू, मग सभाच का नकोचा सवाल

सातारा : कोरोनामुळे शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सभा व्हीसीद्वारे सुरू आहेत. मात्र, प्रश्नांची सोडवणूक होत नाही व विषय अर्धवट राहत असल्याने सर्वसाधारण सभातरी झेडपीतच घेण्यासाठी सदस्य आता आक्रमक झाले आहेत. बाजार सुरू झाले, शाळांची घंटा वाजली, मंदिरे उघडली. मग, कमी संख्या असणारी सभाच झेडपीत का नको असा सवालही सदस्य करु लागले आहेत.याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. गावे, शहरांबरोबरच खेडोपाडीही बाधित सापडू लागले आहेत. तसेच शासकीय कार्यालयातही कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अशीच स्थिती राज्यभरात आहे. त्यामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या सर्वच सभा या व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्याचा निर्णय घेतला. तसा पत्रव्यवहार सर्वच जिल्हा परिषदांना करण्यात आला होता. यामुळे शासनाचे हे बंधन सर्वांवरच आले. परिणामी जिल्हा परिषदेच्या सर्वच सभा, बैठका या व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे होत आहेत.सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांची मासिक सभा, स्थायी समिती सभा या व्हीसीद्वारेच होत आहेत. तसेच आतापर्यंत झालेल्या दोन सर्वसाधारण सभा याही व्हीसीद्वारेच घेण्यात आल्या. त्यातच आता पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सर्वसाधारण सभेचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे बहुतांशी सदस्यांनी सर्वसाधारण सभा सभागृहातच घ्या, म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.सर्वसाधारण सभा व्हीसीद्वारे घेताना टेक्निकल अडचणी निर्माण होतात. तसेच विषयांत सुसूत्रता राहत नाही. सभापटलावर येणारा विषय पूर्ण न होता, अर्धवट राहतो. प्रत्येकजण आपापले विषय पुढे आणत असतो. यामुळे प्रश्नांची आणि विषयांची सोडवणूक होत नाही. त्यामुळे विकासकामांवर परिणाम झाल्याचे सदस्यांतून सांगण्यात येत आहे. एकंदरीतच व्हीसीद्वारे सर्वसाधारण सभा घेण्यास बहुतांशी सदस्यांचा विरोध आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत होणारी सर्वसाधारण सभा प्रशासन कोणत्या पध्दतीने घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.बाजारात शेकडोजण, सभेला ९०...जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला ६४ सदस्य, संबंधित तालुक्यांचे पंचायत समिती सभापती आणि काही अधिकारी उपस्थित असतात. साधारणपणे ९० ते १०० पर्यंत उपस्थितांची संख्या राहते. त्यामुळे गर्दीचा विषय फारसा येत नाही.

त्यातच सोशल डिस्टन्स ठेवायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाऐवजी यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात सर्वसाधारण सभा घ्या. त्यामुळे गर्दी होण्याचा विषयच होत नाही, असा सूर सदस्यांनी लावला आहे. तर दुसरीकडे बाजार सुरू करुन गर्दी होते, शेकडोजण येतात, झेडपीची ९० जणांत होणारी सभाच का समोरासमोर नको, असे सदस्य म्हणू लागले आहेत.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा व्हीसीद्वारे न घेता सभागृहात घेण्याची मागणी जवळपास सर्वच सदस्यांची आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. प्रशासनानेही शासनाला पत्रव्यवहार केला आहे. लवकरच निर्णय अपेक्षित आहे.- उदय कबुले, अध्यक्ष जिल्हा परिषद 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकzpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर