जेवणाचा बेत फसला; ५० जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:29 IST2021-06-01T04:29:55+5:302021-06-01T04:29:55+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाव या गावात रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास विठ्ठलाई देवीच्या मंदिर परिसरात देवीचा देणे देण्याचा धार्मिक ...

जेवणाचा बेत फसला; ५० जणांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाव या गावात रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास विठ्ठलाई देवीच्या मंदिर परिसरात देवीचा देणे देण्याचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुमारे ५० जण मांसाहारी जेवण करण्यासाठी एकत्र आले होते. जमावबंदी आदेशाचा भंग करण्याबरोबरच कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर न पाळता विनामास्क लोक एकत्र आल्याची माहीती कोयना पोलिसांना मिळली. पोलिसांनी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास तातडीने त्या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी काही जण जेवण करताना आढळून आले.
याप्ररकणी आनंदा बाबू विचारे, वसंत पाडुरंग पवार, धोंडीबा रामचंद्र विचारे, नारायण सुंदर विचारे, प्रथमेश आनंद विचारे, रामचंद्र गंगाराम विचारे, संपत गणपत विचारे, दीपक तुकाराम विचारे, सचिन नारायण विचारे, जानू गणपत विचारे, आनंदा सखाराम विचारे, प्रकाश विठ्ठल विचारे, श्रीरंग पाडुरंग विचारे (सर्व रा. नाव) यांच्यासह इतर ३० ते ३५ जणांवर कोयना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालदार एस. एम. संकपाळ तपास करत आहेत.