शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

मातीतले मल्ल आता राजकीय आखाड्यात

By admin | Updated: February 17, 2017 22:55 IST

भुर्इंज गटात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला _- झेडपी दंगल

महेंद्र गायकवाड--पाचवड --भुर्इंज गटात प्रथमच प्रमुख चार पक्षांचे उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यावेळची भुर्इंज गटातील निवडणूक आमदार मकरंदआबा पाटील व किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे. आजपर्यंत या दोन्ही नेत्यांनी वाई तालुक्याबरोबरच जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे खोलवर नेऊन जिल्ह्यात भाजपा व शिवसेनेची दमछाक करून सोडली होती. परंतु यावेळची राजकीय परिस्थिती बदलली असून, देशातील राजकीय बदलाचा परिणाम आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही झाला आहे.दोन्ही नेत्यांचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या व दोघांचेही राजकीय होमपीच ठरलेल्या भुर्इंज गटात शिवसेना व भाजपाने याठिकाणी दमदार उमेदवारी देऊन प्रथमच मतविभागणीला पर्याय उभा केल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीचा विजयी उमेदवार ठरवणारी ही मतविभागणी कमळ की धनुष्यबाणाकडे जाणार याकडे भुर्इंज गटातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पाचवड व भुर्इंज या वाई तालुक्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. निवडणूक रणधुमाळीने सध्या या बाजारपेठांमध्ये सर्वच राजकीय पक्षांची प्रचार यंत्रणा कामाला लागली असून, बाजारपेठा वेगवेगळ्या पक्षांच्या पोस्टर्स व फ्लेक्सनी फुलल्या आहेत. विविध राजकीय पक्षांनी वापरलेल्या नावीन्यपूर्ण प्रचार गीतांमुळे त्या मतदारांचे लक्ष वेधत आहेत. ही निवडणूक कोणासाठी प्रतिष्ठेची तर कोणासाठी अस्तित्वाची लढाई ठरणारी आहे.पैलवान एकमेकांसमोरकिसन वीर कारखान्याचे संचालक व जांबचे पैलवान मधुकर शिंदे यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रचाराचा धुरळा उडवला असून, आपल्या उमेदवारांसाठी सर्व प्रकारचे डावपेच ते या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाड्यात खेळणार आहेत. त्यांच्यासोबत चिंधवली गावचे महान महाराष्ट्र केसरी पैलवान माणिक पवार यांनीही राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रचारात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी भुर्इंजचे पैलवान प्रकाश पावशे यांनी प्रचाराची जबाबदारी घेतली असून, युवा प्रतिष्ठानचे सुधीर भोसले-पाटील यांच्या पत्नी रजनी भोसले-पाटील यांच्या प्रचार यंत्रणेत ते सहभागी आहेत. सर्व पक्षांचा बारकाईने अभ्यास करून नुकतेच कमळ हाती घेतलेले चिंधवलीचे पैलवान जयवंत पवार यांनी भाजपाच्या उमेदवारांसाठी गटातील स्वत:चे कार्यकर्ते कामाला लावले आहेत. मातीच्या कुस्तीत कधीही समोरासमोर न आलेले हे कसलेले मल्ल राजकीय आखाड्यात कुणाला कुठल्या डावावर चितपट करतायत याचीही उत्सुकता भुर्इंज गटात शिगेला पोहोचली आहे.