CoronaVirus Lockdown : माथेफिरूने केला पुन्हा पोलिसावर हल्ला, तोंडावर ओरखडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 15:02 IST2020-04-20T14:20:29+5:302020-04-20T15:02:42+5:30
महिनाभरापूर्वी एका पोलिसावर हल्ला केलेल्या माथेफिरूने पुन्हा आणखी एका पोलिसावर पुन्हा हल्ला केला. यामध्ये संबंधित पोलीस जखमी झाला असून, खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

CoronaVirus Lockdown : माथेफिरूने केला पुन्हा पोलिसावर हल्ला, तोंडावर ओरखडे
सातारा : महिनाभरापूर्वी एका पोलिसावर हल्ला केलेल्या माथेफिरूने पुन्हा आणखी एका पोलिसावर पुन्हा हल्ला केला. यामध्ये संबंधित पोलीस जखमी झाला असून, खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बसस्थानक परिसरातील पोलीस चौकीत कार्यरत असलेले हवालदार अजयराज देशमुख हे सोमवारी सकाळी अकरा वाजता बसस्थानक परिसरामध्ये दुकाने बंद करा, असे सांगत फिरत होते. त्यावेळी संबंधित व्यक्ती तेथून जात होती. देशमुख यांनी त्या व्यक्तीला कुठे फिरताय, असे विचारले.
यावरून संबंधित माथेफिरूने देखमुख यांच्या चेहऱ्यावर हाताने ओरबडले. त्यामुळे ते रक्तबंबाळ झाले. त्यांचे ओठही सुजले. या प्रकारानंतर इतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला तत्काळ ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात नेले. या ठिकाणी त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्याने महिनाभरापूर्वीही एका पोलिसावर हल्ला केल्याचे समोर आले.
या माथेफिरूकडून दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने पोलिसांकडूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित माथेफिरूवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.