डबेवाडी येेथे शेडमधून साहित्य चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:24 IST2021-07-12T04:24:32+5:302021-07-12T04:24:32+5:30

सातारा : तालुक्यातील डबेवाडी येथील एका पत्र्याच्या शेडमधून पत्र्याची पाने, खुर्च्या आणि सिंटेक्स टाकी असा ३२ हजार ६१० रुपयांचा ...

Materials stolen from shed at Dabewadi | डबेवाडी येेथे शेडमधून साहित्य चोरीस

डबेवाडी येेथे शेडमधून साहित्य चोरीस

सातारा : तालुक्यातील डबेवाडी येथील एका पत्र्याच्या शेडमधून पत्र्याची पाने, खुर्च्या आणि सिंटेक्स टाकी असा ३२ हजार ६१० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी अज्ञातावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, चोरीची ही घटना दि. १ जुलै ते दि. ४ जुलै या कालावधीत घडली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

याबाबत राहुल संपत घोरपडे (वय ३५, रा. गोजेगाव, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, राहुल यांचे डबेवाडी गावच्या हद्दीत गट नंबर ८८ मध्ये पत्र्याचे शेड आहे. या शेडच्या पाठीमागे असलेली २५ हजार रुपये किमतीची पत्र्याची २५ पाने, सहा हजार रुपये किमतीच्या ३५ खुर्च्या, पंधराशे रुपये किमतीची पाच हजार लिटरची सिंटेक्स टाकी, लोखंडी पार, तीन खोरी, चार लोखंडी पाट्या असे साहित्य अज्ञाताने चोरून नेले आहे. याबाबतची तक्रार त्यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोईटे करीत आहेत.

Web Title: Materials stolen from shed at Dabewadi