शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

दंगलीचा मास्टर मार्इंड ! सातारनामा

By सचिन जवळकोटे | Updated: July 26, 2018 23:16 IST

दगडफेकीतील जखमी पोलिसाला वाचविणारा तरुण वर्ग आंदोलक होता; परंतु अ‍ॅम्ब्युलन्समधील सिरीयस पेशंटवर हल्ला करणारा नेमका कोण होता?

ठळक मुद्देदगडफेकीतील जखमी पोलिसाला वाचविणारा तरुण वर्ग आंदोलक होता;परंतु अ‍ॅम्ब्युलन्समधील सिरीयस पेशंटवर हल्ला करणारा नेमका कोण होता?

दगडफेकीतील जखमी पोलिसाला वाचविणारा तरुण वर्ग आंदोलक होता;परंतु अ‍ॅम्ब्युलन्समधील सिरीयस पेशंटवर हल्ला करणारा नेमका कोण होता?

- सचिन जवळकोटेआजपावेतो महाराष्टत कैक दंगली घडल्या. जाळपोळी झाल्या. हिंसाचाराचा आगडोंब उसळला; मात्र, संयमी सातारा नेहमीच शांत राहिला. सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून जगत राहिला. कालचा सातारा मात्र नेहमीचा सातारा नव्हता. तो तर रक्तानं बरबटलेल्या खुनशी हातांच्या तावडीत सापडलेला बेहाल सातारा होता. सिरीयस पेशंटला घेऊन जाणाºया अ‍ॅम्ब्युलन्सचीही निर्दयीपणे तोडफोड करणाºया दंगेखोरांपुढं हतबल झालेला सातारा होता.. कारण यांचा कर्ताकरविता वेगळा होता. म्हणूनच आता आक्रमकपणे पुढाकार घेऊन पोलिसांचा कॅमेरा शोध घेतोय, ‘दंगलीचा मास्टर मार्इंड कोण होता?’

आंदोलनाच्या ठिकाणीच ‘हायवेकडं चला ऽऽ’चा इशाराजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘बाबाराजें’चं भाषण सुरू झालं, तेव्हा घोळक्यातून हुर्रेऽऽ बाजी सुरू झाली. ‘बाबाराजे’ केवळ साताºयाचे आमदार नसून शिवघराण्याचे वंशजही, तरीही त्यांच्यासमोरची ही टपोरीगिरी साºयांसाठीच धक्कादायक ठरली. हे ‘हुल्लडबाज’ साताºयाचे नाहीत, हे अनेकांनी ओळखलं. इथंच अनेकांच्या मनात कुशंकेची पाल चुकचुकली. याचवेळी या घोळक्यातले काहीजण ‘हायवेकडं चला ऽऽ हायवेकडं ऽऽ’ असा एकमेकांना इशारा करू लागले. याचा अर्थ ‘हायवे कांडाचा कट’ अगोदरच शिजला होता. साताºयाच्या बदनामीचा किडा यापूर्वीच अनेकांच्या डोक्यात वळवळला होता. यासाठीच याचे सूत्रधार रॅलीत ‘आंदोलक’ म्हणून मोर्चात घुसले होते.. म्हणूनच एक प्रश्न साºयांना सतावतोय, ‘दंगलीचा मास्टर मार्इंड कोण होता?’

उड्डाणपुलाखाली अगोदरच पोत्यात भरलेल्या दगडांचा वर्षावमोर्चा संपला. आंदोलकांची पांगापांग झाली.. अन् इथूनच ‘प्री प्लॅन्ड गेम’ला ‘हायवे’वर सुरुवात झाली. काही टपोरी पोरं ‘हायवे’वर बसगाड्या अडवून फोडू पाहताहेत, हा मेसेज मिळताच एस्पी स्वत: घटनास्थळी धडकले. ‘समोरच्या जमावाला आपण नेहमीप्रमाणे समजावून शांत करू शकू,’ असा त्यांना विश्वास होता, म्हणूनच हेल्मेट न घालताच ते जमावासमोर गेले. मात्र, त्यांचा विश्वास फोल ठरला. त्यांच्यासमोरच

काही टारगट पोरांनी चक्क ‘बोंब’ ठोकली.‘हायवे’चे भलेमोठे ‘बॅरिकेटस्’ चक्क हातानं तोडून रस्त्यावर फेकले. काहीजण वीस-वीस किलोची दगडं उचलून तोडफोड करू लागले. ‘हे तोड रेऽऽ ते फोड रेऽऽ तिकडं जाळ रेऽऽ’ असं जोरजोरात ओरडत काहीजण मिसरूडही न फुटलेल्या कोवळ्या पोरांना भडकावू लागले. उड्डाणपुलाखाली अगोदरच पोत्यात भरून ठेवलेल्या दगडांचा तुफान वर्षाव होऊ लागला. यावेळी एस्पींच्या हातालाही जखम झाली. त्यांच्या गाडीची काचही फुटली. तेव्हा तत्काळ तिथून ते निघून गेले. मात्र, जाताना त्यांच्याही डोक्यात प्रकाश पडला, ‘खाकीवर धावून जाणारा हा जमाव खराखुरा आंदोलक नव्हता !’ होय... त्यांचा कर्ता-करविता वेगळाच होता; पण दंगलीचा मास्टर मार्इंड कोण होता?

तोंडाला रुमाल अन् डोळ्यावर गॉगल...‘हायवे’वर पोलिसांसमोर बिनधास्तपणे तोडफोड करणाºया अनेकांनी तोंडाला रुमाल अन् डोळ्यावर गॉगल चढविला होता. आपली ओळख पटू नये, यासाठी त्यांनी अगोदरच तयारी करून ठेवली होती. मोबाईलवर शूटिंग करणाºया बघ्यांना अन् मीडियाच्या कॅमेरामन्सना त्यांनी पद्धतशीरपणे दमदाटीही केली. हिंसाचार करताना कुठेही पुरावे न ठेवण्याचा त्यांचा ‘प्लॅन’ अत्यंत ‘प्रोफेशनल’ होता. धंदेवाईक गुन्हेगारालाही लाजविणारा होता. म्हणूनच एक गूढ सर्वांसमोर उभं ठाकलंय, ‘दंगलीचा मास्टर मार्इंड कोण होता?’

जखमी पोलीसदादासोबत ट्रीपलसीट ‘सिव्हिल’कडे..हल्लेखोरांच्या दगडफेकीत तब्बल २९ पोलीस कर्मचारी जखमी झाले. अनेकांची डोकी फुटली. कैकजण रक्तबंबाळ झाले. डोक्याला मोठा दगड लागल्याने एक वयस्कर पोलीस कर्मचारी ‘सर्व्हिस रोड’वर आडवा पडला. तडफडू लागला. तळमळू लागला. तेव्हा लगतच्या काही बघ्या तरुणांनी दगडांच्या वर्षावातही त्यांच्याकडे धाव घेतली. त्या पोलीसदादाला अक्षरश:उचलून मोटारसायकलवर बसविलं.. अन् ट्रीपलसीट गाडी ‘सिव्हिल’कडे पिटाळली. विशेष म्हणजे जीव धोक्यात घालून एका पोलिसाला वाचविणारा हा तरुण वर्ग अस्सल मराठा आंदोलक होता. मात्र, याचवेळी ‘हायवे’वरची एक अ‍ॅम्ब्युलन्स फोडून आतल्या सिरीयस पेशंटवर दगडं फेकणारा जमाव नेमका कोण होता? दंगलीचा मास्टर मार्इंड कोण होता?’

दंगेखोरांच्या पुणे पासिंग गाड्या कोरेगावकडे रवाना..१.    दंगलीची सुरुवात करून नंतर आपापल्या पुणे पासिंगच्या टऌ-12 अन् टऌ-14 गाड्यांमधून कोरेगावच्या दिशेनं गायब झालेल्या दंगेखोरांना आज वाटत असेल की आता आपलं काम फत्ते झालं. आपण सुटलो; पण त्यांना कुठं माहितंय की, ‘हायवेवर दंगल’ भडकत असताना एका बिल्डिंगच्या टेरेसवरून या साºया दंगेखोरांचं चित्रीकरण अत्यंत शांतपणे केलं जात होतं.२.    पोलिसांचा कॅमेरा प्रत्येकाचा ‘क्लोज चेहरा’ अचूकपणे टिपत होता. या व्हिडीओ क्लिप्स् बघून आता एकेकाला उचललं जाईल. त्यांच्या तळपायाच्या वेदना गालफडापर्यंत पोहोचतील, तेव्हा ते पोपटासारखं घडाऽऽ घडाऽऽ बोलू लागतील. ते ‘कोरेगाव’च्याच दिशेनं का गेले, याचा उलगडा होईल.३.    उपनगरातील नामचीन गुंडांचे ‘प्रताप’ बाहेर येतील. परजिल्ह्यातील ‘प्रतिष्ठान’वाल्यांचीही खरी भूमिका स्पष्ट होईल.. तेव्हा सारे पत्ते ओपन होतील, ‘दंगलीचा मास्टर मार्इंड कोण होता?’

‘त्या’ नेत्याची धक्कादायक आॅडिओ क्लिप ताब्यात...एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तावातावानं भाषण ठोकणारी काही नेते मंडळी ‘हायवे’ भडकल्यावर मात्र नेमकी कुठं गेली होती, असा प्रश्न आता उपस्थित झालाय. या दंगलीबाबत संबंधित नेत्यांचा नेमका रोल काय, याचीही चौकशी ‘खाकी’नं सखोलपणे सुरू केलीय. दंगलीपूर्वी एका नेत्यानं काही कार्यकर्त्यांशी केलेल्या स्फोटक संवादाची आॅडिओ क्लिपही ‘खाकी’च्या हाती लागलीय. विशेष म्हणजे, याच नेत्याच्या एका कट्टर कार्यकर्त्यालाही प्रतापसिंहनगर परिसरातून ताब्यात घेतलं गेलंय. कदाचित या साºया धक्कादायक पुराव्यांवरून ‘सातारा-कोरेगाव’ रस्त्यावरील ‘प्लॅन’ची ‘लिंक’ अचूकपणे या नेत्यापर्यंत पोहोचली तरी ‘दंगलीचा ठपका’ ठेवण्याचं धाडस दाखविलं जाणार काय, हा कळीचाच मुद्दा. असो. अजून एक चिंताजनक बाब समोर आलीय. ती म्हणजे, पोलिसांवर तुफान दगडफेक करणाºया जमावातील एकाच्या हातात चक्क गावठी कट्टा होता.. कदाचित दुर्दैवानं याचा वापर झाला असता तर ? म्हणूनच साताºयाच्या भल्यासाठी याचा शोध लागणं गरजेचं, ‘दंगलीचा मास्टर मार्इंड कोण होता?’  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarathaमराठाPoliticsराजकारणPoliceपोलिस