शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील भीषण स्फोटप्रकरणी दोघांना अटक, पाच दिवस पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 12:02 IST

स्फोटक पदार्थ जवळ बाळगल्याने कारवाई

सातारा : येथील माची पेठेत झालेल्या भीषण स्फोटप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. संबंधितांनी स्फोटक पदार्थ जवळ बाळगून दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण केला, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.शाहीद हमीद पालकर (वय ३६), तबरेज गणी पालकर (वय ४२, रा. गुरूवार परज, सातारा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अदालत वाड्याशेजारी असणाऱ्या माची पेठेतील एका दुकानात बुधवार, दि. २ रोजी दुपारी दीड वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटात मुजम्मील हमीद पालकर (वय ४२, रा. गुरूवार पेठ, सातारा) हे जागीच ठार झाले तर नमाजासाठी जाणारे बापलेक या स्फोटात गंभीर जखमी झाले. या स्फोटानंतर पोलिस दलातील सर्व तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. फटाक्यांच्या दारूचा हा स्फोट असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. ज्यांनी हे स्फोटक पदार्थ आणले त्यांचा पोलिसांनी रात्री शोध घेतला. या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी शाहीद पालकर आणि तबरेज पालकर या दोघांना अटक केली. त्यांची रात्रभर कसून चाैकशी करण्यात आली.त्यानंतर गुरूवारी दुपारी त्यांना न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने त्यांना दि. ७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी स्फोटक पदार्थ नेमके आणले कोठून, त्यांच्याकडे कोणताही परवाना नसताना घातक पदार्थ त्यांनी जवळ का बाळगले, यासंदर्भात पोलिस त्यांच्याकडे कसून चाैकशी करत आहेत. या प्रकरणाचा पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के हे अधिक तपास करत आहेत.

नमुने नागपूरला पाठवलेस्फोट झाल्यानंतर रात्री पुण्यातील एटीसीचे पथक साताऱ्यात आले. या पथकाने आणि सातारा पोलिसांनी घेतलेले घटनास्थळाचे नुमने नागपूर येथील फाॅरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच यातील आणखी वस्तूस्थिती समोर येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस