मारुती जाधवची कुलदीप यादववर मात
By Admin | Updated: April 13, 2015 00:04 IST2015-04-12T22:41:25+5:302015-04-13T00:04:42+5:30
दरुजचे कुस्ती मैदान : खंडोबा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मारुती जाधवची कुलदीप यादववर मात
खटाव : दरुज, ता. खटाव येथील श्री खंडोबा यात्रेनिमित्तआयोजित केलेल्या मैदानात प्रथम क्रमांकाच्या निकाली कुस्तीत कोल्हापूरचा मल्ल मारुती जाधव याने दिल्लीचा मल्ल कुलदीप सिंग यादव याला लपेट डावावर आस्मान दाखवले.
या कुस्तीचे पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दिलीप पवार यांनी काम पाहिले. या कुस्ती मैदानात दोनशेहून अधिक निकाली कुस्त्या झाल्या.संजय जगदाळे, महेश पुंडे, प्रदीप विधाते, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, नंदकुमार पाटोळे, मल्ल सनी पाटोळे, सरपंच तानाजी पाटोळे, डॉ. कालीदास पाटोळे, महादेव पाटोळे, प्रमोद पाटोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मैदानाचा प्रारंभ करण्यात आला.
दुसऱ्या क्रमांकाच्या सातारा तालीम संघाचा मल्ल पांडुरंग मांडवे, न्यू मोतिबाग तालीम मंडळ कोल्हापूरचा मल्ल संग्राम शिंदे याची कुस्ती बऱ्याच वेळानंतर बरोबरीत सोडवण्यात आली.
चौथ्या क्रमांकासाठी दिलीपसिंह गाडीवाले नांदेड यांचा मल्ल जितू सिंग (दिल्ली) यांनी भोसले व्यायाम शाळा सांगलीचा मल्ल प्रशांत शिंदे (जाखणगाव) याला आस्मान दाखविले. अन्य प्रमुख लढतीमध्ये धीरज पवार (पिंपरी), मल्ल गणेश राक्षे (पुसेसावळी) , मल्ल अक्षय जाधव (साप) या मल्लांनी प्रतिस्पर्धी मल्लाना धूळ चारली.
पंच म्हणून तानाजी पवार, तानाजी मांडवे, भरत जगदाळे, अंकुश कुमठे, वसंत पाटोळे, आदिक जाधव, अर्जुन पाटील, बयाजी पाटोळे काम पाहिले. यावेळी खटाव तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून कुस्ती रसिक आले होते. (वार्ताहर)