शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: विहिरीत चप्पल तरंगताना दिसली अन् कळले विवाहितेने आत्महत्या केली; चौघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 12:42 IST

कऱ्हाड : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आटके, ता. कऱ्हाड येथील चौघांवर कऱ्हाड ग्रामीण ...

कऱ्हाड : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आटके, ता. कऱ्हाड येथील चौघांवर कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश नंदकुमार यादव (रा. भिलवडी स्टेशन, ता. पलुस) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.पती संदीप भगवान पाटील, सासरा भगवान पाटील, सासू पार्वती भगवान पाटील व नणंद दीपाली भगवान पाटील (सर्व रा. आटके, ता. कऱ्हाड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर कोमल संदीप पाटील असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आटके येथील संदीप पाटील याचा भिलवडी स्टेशन येथील कोमल हिच्याशी १४ फेब्रुवारी २०१७ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर दोन वर्षे सासरच्यांनी कोमलला चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर त्यांनी कौटुंबिक कारणावरून तिला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण सुरू केली. जानेवारी २०२१ मध्ये तिच्याशी वाद घालून मारहाण केल्यामुळे कोमल माहेरी भिलवडी येथे गेली. त्यावेळी विश्रामबाग पोलिस ठाण्यातील समुपदेशन कक्षात तक्रार नोंदवून पती संदीपसह इतरांना समज देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्याकडून कोमलला त्रास दिला जात होता.दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पती संदीप याने कोमलचा भाऊ आकाश याला फोन करून कोमल माहेरी आली आहे का, अशी विचारणा केली. तसेच ती घरात नसल्याचे सांगितले. त्यामुळे माहेरचे नातेवाईक तातडीने आटके येथे आले. त्यावेळी एका विहिरीत चप्पल पाण्यावर तरंगताना दिसली. ग्रामस्थांना संशय आल्यामुळे त्यांनी विहिरीत शोध घेतला असता कोमलचा मृतदेह आढळून आला.सासरच्यांनी दिलेल्या शारीरिक, मानसिक त्रासामुळे कोमलने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार आकाश यादव यांनी कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस