विवाहितेचा जाचहाट; पतीसह पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST2021-07-16T04:27:14+5:302021-07-16T04:27:14+5:30

सातारा: शाहूपुरी येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

Marital harassment; Crime against five people including husband | विवाहितेचा जाचहाट; पतीसह पाच जणांवर गुन्हा

विवाहितेचा जाचहाट; पतीसह पाच जणांवर गुन्हा

सातारा: शाहूपुरी येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पती प्रशांत महादेव सानप, सासरे महादेव मारुती सानप, सासू संगीता महादेव सानप (सर्व रा. शांती संदेश बिल्डिंग, घनसोली, नवी मुंबई), नणंद प्रियांका संदीप खाडे (रा. निगडी, पुणे), पतीचे मामा दत्तात्रय दिनकर खाडे व पतीची मामी (दोन्ही रा. मांडवे, ता. खटाव), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत भारती प्रशांत सानप (रा. शिवाजीनगर, शाहूपुरी) यांनी फिर्याद दिली आहे. २७ डिसेंबर २०२० पासून आजपर्यंत संशयितांनी चारित्र्याच्या संशयावरून तसेच पैशाची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचे भारती यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार जाधव हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Marital harassment; Crime against five people including husband