शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या 'मनाली'ची गरुडझेप, अंतराळ संस्था ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 08:02 IST

सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील राजापूर या लहानशा गावातील मनालीची ही गरुडझेप साताऱ्यात कौतुकाचा विषय बनला आहे.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील राजापूर या लहानशा गावातील मनालीची ही गरुडझेप साताऱ्यात कौतुकाचा विषय बनला आहे. मनालीचे मूळ गाव राजापूर, ता. खटाव हे असून वडील महेंद्र सध्या सातारा येथे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात विस्ताराधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

सातारा - सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील, जावळीच्या जंगलातील सातारकर देशाच्या रक्षणासाठी काश्मीरच्या सीमारेषेवर उत्साहाने तैनात असतात. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक जवान सैन्यदलाच भरती होतात. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील देशपातळीवर एक वेगळीच ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा, लढवैय्या आणि शूरवीरांचा जिल्हा म्हणून साताऱ्याकडे पाहिले. साताऱ्याच्या या मातीतील एका युवतीने अंतराळात झेप घेतली आहे. देशाची अंतराळ संशोधन असलेल्या इस्रोमध्ये साताऱ्याच्या मनाली महेंद्र सपाटे हिची निवड झाली आहे. त्यामुळे, साताऱ्यासह महाराष्ट्रासाठी ही कौतुकाची बाब आहे.  

सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील राजापूर या लहानशा गावातील मनालीची ही गरुडझेप साताऱ्यात कौतुकाचा विषय बनला आहे. मनाली महेंद्र सपाटे हिची इंडियन रिसर्च सेंटर( इस्रो) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. मनालीच्या संशोधनातून सातार्‍याचा झेंडा आता इस्रोमध्येही झळकणार आहे. मनालीसह तिच्या कुटुंबीयांना अत्यानंद झाला आहे. सन 2018 मध्ये दिलेल्या परीक्षेत आणि त्यानंतरच्या मुलाखतीमधून तिची निवड करण्यात आली आहे. 

मनालीचे मूळ गाव राजापूर, ता. खटाव हे असून वडील महेंद्र सध्या सातारा येथे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात विस्ताराधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर, आई गृहिणी आहे. मनालीचे प्राथमिक शिक्षण  राजापूर जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. तर, माध्यमिक शिक्षण अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात घेतले. त्यानंतर, मनालीने एमटेकचे उच्च शिक्षण बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे पूर्ण केले. एमटेकचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनालीने गेट परीक्षेत देशात 13 वी रँक मिळवत यश मिळवले. या निवडीबद्दल मनालीचे निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी.आर. गारळे, नरेगाचे उपसचिव प्रमोद शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अर्चना वाघमळे, गटविकास अधिकारी श्रीमती क्रांती बोराटे, उदयकुमार कुसूरकर, संभाजी पाटील, संदीप दीक्षित, जयवंत ढाणे व राजापूर ग्रामस्थांनी अभिनंदन केले. तसेच स्थानिक पुढाऱ्यांनीही याबाबत मनालीचे कौतुक केले आहे.

दरम्यान, मनालीची ही नियुक्ती साताऱ्यासह महाराष्ट्रासाठी अभिमानाची निवड आहे. कारण, मनालीच्या रुपाने इस्रोमध्येही आता मराठी झेंडा फडकला आहे.   

टॅग्स :Satara areaसातारा परिसरisroइस्रोBengaluruबेंगळूरsatara-acसातारा