Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणासाठी दहिवडीत रॅली, ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 16:00 IST2018-07-30T15:58:15+5:302018-07-30T16:00:30+5:30
मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर लागू करावे, या मागणीसाठी माण तालुक्यातील दहिवडी येथे मराठा समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली. ही रॅली तहसील कार्यालयासमोर आली असता ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये हजार स्त्री-पुरुष सहभागी झाले.

Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणासाठी दहिवडीत रॅली, ठिय्या आंदोलन
दहिवडी (सातारा) : मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर लागू करावे, या मागणीसाठी माण तालुक्यातील दहिवडी येथे मराठा समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली. ही रॅली तहसील कार्यालयासमोर आली असता ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये हजार स्त्री-पुरुष सहभागी झाले.
दहिवडी येथे सोमवारी सकाळी मराठा समाजाच्या वतीने सिध्दनाथ मंदिरापासून रॅलीला प्रारंभ झाला. बाजार पटांगण, मायणी चौक, फलटण चौक, कर्मवीर पुतळ्यापासून रॅली गेली. ही रॅली दुपारी बाराच्या सुमारास तहसील कार्यालय परिसरात आली.
यामध्ये महिला, शालेय विद्यार्थी, तरुण वगार्पासून अबाल वृध्दांनी सहभाग घेतला. शिस्तबद्धपणे निघालेल्या रॅलीत विविध घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर समाजबांधवांनी ठिय्या मांडला. त्यानंतर अनेकांनी संतप्त भावना व्यक्त करत मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण लागू करण्याची मागणी केली.