Maratha Kranti Morcha : सातारा जिल्ह्यात आंदोलनास प्रारंभ, बाजारपेठेत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 12:22 IST2018-08-09T12:19:30+5:302018-08-09T12:22:38+5:30
मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला सातारा जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सातारा, कऱ्हाड, फलटण तालुक्यांतील बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे तरुणांनी मुंडण आंदोलन केले. तर फलटण तालुक्यात रास्ता रोको करण्यात आला.

Maratha Kranti Morcha : सातारा जिल्ह्यात आंदोलनास प्रारंभ, बाजारपेठेत शुकशुकाट
सातारा : मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला सातारा जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सातारा, कऱ्हाड, फलटण तालुक्यांतील बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे तरुणांनी मुंडण आंदोलन केले. तर फलटण तालुक्यात रास्ता रोको करण्यात आला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी सर्वच ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मेडिकल दुकानांचे अपवाद वगळता साताऱ्यातील सर्वच दुकाने, रिक्षा वाहतूक बंद आहे.
वाई-वाठार मार्गावर पिंपोडे बुद्रुकमध्ये जमलेल्या तरुणांनी सकाळी दहाच्या सुमारास रास्ता रोको करून मुंडण आंदोलन केले. यावेळी आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. तर फलटण तालुक्यातील आळजापूर फाटा येथेही रास्ता रोको करण्यात आला.