शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

खाकीच्या पेहराव्यात वावरली, पण कधीच नाही ‘ती’ बावरली; आत्महत्येनंतर अनेक किस्से समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 18:57 IST

पोलिसांची वर्दी घालून ती इन्स्टाग्राम वर व्हिडीओ, फोटो अपलोड करत होती

विकास शिंदेमलटण : चौधरवाडी, ता फलटण येथील आत्महत्या केलेल्या ऋतुजा सुशांत रासकर (वय २२) हिच्या मृत्यू नंतर अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत. तिने टोकाचा निर्णय घेण्यापाठीमागे नक्की कारण काय, हे मात्र, उघड झालं नसलं तरी तब्बल दोन वर्षे ती मुबंई पोलिस म्हणून खाकीच्या पेहराव्यात वावरत होती. मात्र, कधीच ती बावरली नाही. इतक्या सराईतपणे ती अंगावर खाकी वर्दी घालून सार्वजनिक ठिकाणी फिरत होती.ऋतूजाने प्रेम विवाह केल्यानंतर आपला दरारा सासरच्या लोकांच्यावर असावा किंवा प्रेमविवाहाचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून ती पोलिस म्हणून वावरत होती, अशीही एक बाजू समोर येतेय. परंतू या पुढे जाऊन काही गोष्टी कायद्याच्या दृष्टीने व पोलिसांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ती इतके दिवस पोलिस असल्याचे नुसते सांगत नव्हती तर पोलिसांची वर्दी घालून ती इन्स्टाग्राम वर व्हिडीओ, फोटो अपलोड करत होती. हे व्हिडीओ फोटो कुणीच पाहिले नाहीत असेही नाही. तिच्या व्हिडीओ व फोटोला बघणारे लाखोंच्या घरात आहेत मग पोलिसांना कधी हे दिसलं नाही का, असाही प्रश्न उपस्थित होतोय.एक तरुण मुलगी पोलिस नसताना पोलिस मुख्यालयात जाते तिथे फोटो काढते. पोलिसांच्या दुचाकी ,व्हॅन यासमोर फोटो काढते एवढेच नव्हे तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वारीमध्ये पाणी व खाऊ वाटप करते. त्याचे इन्स्टाग्राम वर व्हिडीओ टाकते. या गोष्टी पोलिसांना कधी दिसल्या नाहीत किंवा तिच्या जवळच्या कुणाला कधी शंका आली नाही.तिच्याकडे वर्दी , पोलिसांचे ओळखपत्र ,बॅच या गोष्टी आल्या कुठून. एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ती ही वर्दी या सर्व गोष्टी पाडव्याच्या पूजेत पूजन करताना दिसते. यावरून वर्दी बद्दल तिला किती प्रेम होतं हे कळतं. पोलिस होण्याची तिची महत्वकांक्षा खूप मोठी होती. ती पोलिस नसताना पोलिस म्हणून जगत होती. वर्दी आणि पोलिस खाते याबद्दल ती आपल्या पोस्टमधून सतत बोलत होती. असे असले तरी तिच्या जवळच्या कुणीतरी तिचे समुपदेशन करायला हवे होते, अशी मनातील सल अनेकांनी बोलून दाखवली.या दोन्ही कारणांचा शोध हवा...गेल्यावर्षी तिने सायबर क्राईम मुंबईमध्ये नोकरीला लागल्याबद्दल पेढेही वाटले होते. तिने आत्महत्या करेपर्यंत ती मुंबई पोलिस कर्मचारी नाही, हे कुणालाच माहिती नव्हते. तिच्या आत्महत्येच्या कारणाइतकेच ती पोलिस बनून का वावरत होती, त्याचा फलटण पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस