आझाद समाज पार्टीच्या फलटण तालुकाध्यक्षपदी मनोज आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:26 IST2021-07-10T04:26:56+5:302021-07-10T04:26:56+5:30

फलटण : आझाद समाज पार्टीच्या फलटण येथे झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. फलटण शहराध्यक्षपदी योगेश माने ...

Manoj Adhav as Phaltan taluka president of Azad Samaj Party | आझाद समाज पार्टीच्या फलटण तालुकाध्यक्षपदी मनोज आढाव

आझाद समाज पार्टीच्या फलटण तालुकाध्यक्षपदी मनोज आढाव

फलटण : आझाद समाज पार्टीच्या फलटण येथे झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. फलटण शहराध्यक्षपदी योगेश माने यांची, तर तालुकाध्यक्षपदी मनोज आढाव यांची निवड झाली आहे.

आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद व राज्याध्यक्ष राहुल प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली, फलटण येथे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सनी काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. या वेळी जाहीर करण्यात आलेल्या निवडी अशा : पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मंगेश आवळे, सातारा जिल्हाध्यक्ष आतिष कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव गायकवाड, शहर कार्यकारिणी फलटण शहराध्यक्ष योगेश माने, कार्याध्यक्ष साहिल काकडे, शहर उपाध्यक्ष लखन अडागळे, गणेश रणपिसे, सूरज भैलुमे, सुनील पवार, सचिव अर्जुन जाधव, संपर्कप्रमुख राहुल म्हेत्रे. तालुका कार्यकारिणी फलटण तालुकाध्यक्ष मनोज आढाव, कार्याध्यक्ष जीवन मोरे, उपाध्यक्ष किरण मोरे, केतन जाधव, बाळासो लोंढे, अजित मोरे, संघटक शंकर अडागळे, संपर्कप्रमुख स्वप्निल मोहिते यांची निवड झाली.

Web Title: Manoj Adhav as Phaltan taluka president of Azad Samaj Party