राज्यस्तरीय समितीकडून मान्याचीवाडीची तपासणी
By Admin | Updated: January 15, 2015 23:33 IST2015-01-15T21:30:21+5:302015-01-15T23:33:16+5:30
समितीने या गावाला भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली़

राज्यस्तरीय समितीकडून मान्याचीवाडीची तपासणी
सणबूर : यशवंत पंचायतराजमध्ये पुणे विभागीय पातळीवर पहिल्या दोन ग्रामपंचायतींमध्ये स्थान पटकावून हॅट््ट्रिक करणाऱ्या मान्याचीवाडीला राज्यस्तरीय समितीने भेट देऊन विविध उपक्रमांची तपासणी केली़ यशवंत पंचायत राजमध्ये यापूर्वी या गावाचा देशपातळीवर गौरव झाला आहे़ यंदाही गावाने परंपरा अखंड ठेवली आहे. राज्यस्तरीय निवड समितीने या गावाला भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली़ ग्रामपंचायतीची कामकाजपध्दती, पारदर्शकता, शासनाच्या योजनांची आंमलबजावणी, ग्रामसभा, करवसुली, पाणीपुरवठा, सांडपाणी व कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने गुणांकन करण्यात आले़ विजय सोनारे व अमोल मव्हाले या समिती सदस्यांचे गावाच्या प्रवेशद्वारावर त्यांचे स्वागत करण्यात आले. गटविकास अधिकारी अरविंद पाटील, विस्तार अधिकारी टी़ टी़ थोरात, सरपंच संगीता पाचुपते, सदस्य दिलीपराव गुंजाळकर, ग्रामसेवक प्रसाद यादव, साहेबराव माने, उत्तमराव माने, संपतराव माने, कुसूमताई माने, अधिकराव माने आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)