नवऱ्याचा बायकोवर राग अन् दहा घरे जळून खाक; ५० लाखांचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 09:19 AM2021-10-20T09:19:16+5:302021-10-20T09:19:28+5:30

पतीसोबत भांडण झाल्याने पत्नी घर सोडून माहेरी गेली. या नैराश्येतून दारूच्या नशेत पतीने राहते घरच पेटवून दिल्याची घटना चाफळ विभागातील माजगाव येथे सोमवारी सायंकाळी घडली. यात आसपासची नऊ घरे जळून पूर्णपणे राख झाली.

man in satara set fire to his house along with others as his wife was angry with him | नवऱ्याचा बायकोवर राग अन् दहा घरे जळून खाक; ५० लाखांचं नुकसान

नवऱ्याचा बायकोवर राग अन् दहा घरे जळून खाक; ५० लाखांचं नुकसान

Next

चाफळ ( जि. सातारा) : पतीसोबत भांडण झाल्याने पत्नी घर सोडून माहेरी गेली. या नैराश्येतून दारूच्या नशेत पतीने राहते घरच पेटवून दिल्याची घटना चाफळ विभागातील माजगाव येथे सोमवारी सायंकाळी घडली. यात आसपासची नऊ घरे जळून पूर्णपणे राख झाली. या आगीत संसाराेपयोगी साहित्यासह अन्नधान्य, शेती अवजारे जळून अंदाजे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे नऊ कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला आहे.

संशयित संजय रामचंद्र पाटील याला पोलिसांनी रात्री उशिरा अटक करून गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सकाळपासून संजय व त्यांच्या पत्नीत कौटुंबिक वाद सुरू होता. या वादातून पल्लवी मुलाला घेऊन माहेरी निघून गेल्या होत्या. या नैराश्येतून दारूच्या नशेत रागाच्या भरात संजय याने राहते घर पेटवून दिले. त्यामध्ये घरातील दोन गॅस सिलिंडरने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे वाड्यातील नऊ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यानंतर पोलिसांनी पाटील यांना अटक केली.

Web Title: man in satara set fire to his house along with others as his wife was angry with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app