Satara: माण पंचायत समितीला मिळणार नवीन इमारत, प्रशासकीय मान्यता प्राप्त

By नितीन काळेल | Published: October 6, 2023 06:56 PM2023-10-06T18:56:54+5:302023-10-06T18:57:20+5:30

२३ कोटींचा खर्च; तीन वर्षांत सुसज्ज इमारत उभी राहणार 

Man Panchayat Samiti to get new building, gets administrative approval | Satara: माण पंचायत समितीला मिळणार नवीन इमारत, प्रशासकीय मान्यता प्राप्त

Satara: माण पंचायत समितीला मिळणार नवीन इमारत, प्रशासकीय मान्यता प्राप्त

googlenewsNext

सातारा : माणपंचायत समितीची इमारत धोकादायक झाली होती. कामकाजासाठी पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी जागा मिळवून नवीन इमारतीसाठी प्रयत्न केले. त्यानुसार नवीन इमारत होणार असून २३ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे तीन वर्षांत सुसज्ज अशी इमारत उभी राहणार आहे.

याबाबत जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी माहिती दिली. यावेळी अतिरक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे आदी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी म्हणाले, माणपंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. त्याप्रकारे ग्रामविकास विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. नूतन इमारतीचे सुमारे २३ कोटी रुपये इतके अंदाजपत्रक आहे. ही नवीन प्रशासकीय इमारत दहिवडीतील पशुवैद्यकीय जागेच्या ठिकाणी होणार आहे. इमारत बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ ५ हजार ४६६.९२ चौ.मी. इतके प्रस्तावित करण्यात आलेले आहे.

माणमधील या प्रशासकीय इमारत बांधकामामध्ये ग्रीन बिल्डींग संकल्पना अंमलात आणण्यात येणार आहे. तसेच नैसर्गिक प्रकाशयोजना व वायुवीजन, पाणी आणि उर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुनर्भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधन सामुग्रीचा वापर करण्यात येणार आहे. इमारतीचे काम हाती घेतल्यापासून जास्तीत जास्त तीन वर्षांत पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहितीही मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी यांनी दिली. 

माण पंचायत समितीची इमारत जीर्ण आणि धोकादायक झालेली होती. कर्मचाऱ्यांना पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे नवीन इमारतीसाठी प्रयत्न करण्यात आले. आता नवीन इमारतीस प्रशासकीय मान्यताही प्राप्त झाली असून सुमारे २३ कोटी रुपये खर्च होणार आहे. काम सुरू झाल्यापासून ही नवीन इमारत तीन वर्षांत पूर्ण होईल. - ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: Man Panchayat Samiti to get new building, gets administrative approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.