शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

Satara: महिलेवर कोयत्याने वार करणाऱ्यास अटक, जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक

By संजय पाटील | Updated: February 14, 2025 17:59 IST

कऱ्हाड : प्रेमसंबंधातून महिलेवर कोयत्याने वार करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने वहागाव ...

कऱ्हाड : प्रेमसंबंधातून महिलेवर कोयत्याने वार करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने वहागाव येथे आज, शुक्रवारी पहाटे ही कारवाई केली. दरम्यान, कोयता हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.रविंद्र सुभाष पवार (वय ३५, रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर-आगाशिवनगर येथील पीडित महिलेचे रवींद्र पवार यांच्याशी प्रेमसंबंध होते. गुरुवारी दुपारी रवींद्र हा संबंधित महिलेच्या घरात गेला होता. त्यावेळी बराचवेळ त्यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र, काही वेळाने चिडून जाऊन रवींद्र याने स्वतःसोबत आणलेल्या कोयत्याने संबंधित महिलेवर वार केले.त्यामध्ये गंभीर जखमी होऊन संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली. यावेळी झालेल्या आरडाओरड्यामुळे परिसरातील नागरिक त्याठिकाणी जमले. त्याचवेळी हल्लेखोर रवींद्र पवार याने तेथून पळ काढला. नागरिकांनी जखमी महिलेला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले.घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून हल्लेखोराचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत आगाशिवनगर डोंगर परिसरात त्याचा शोध घेतला जात होता. तसेच श्वान पथकामार्फतही त्याचा माग काढण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी पहाटे रवींद्र पवार हा वहागावच्या हद्दीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केले. हल्ल्यापाठीमागील नेमके कारण तपासातून समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस