शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला विचारात घेऊनच निर्णय होईल, असे मजबूत संघटन करा; अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना 

By दीपक देशमुख | Updated: July 19, 2024 18:17 IST

सातारा विधानसभेसाठी पदाधिकारी आग्रही

सातारा : आगामी निवडणुकांच्या दृष्टीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत दिले.सातारा येथे आज, शुक्रवारी शिवशस्त्र शौर्यगाथा शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार काल, गुरूवारी रात्रीच सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आले होते. आज, सकाळी ११ वाजता पवार यांनी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन कार्यालय व परिसराची पाहणी करून हा परिसर सुशोभित करण्याच्या सूचना केल्या. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, किसन वीरचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, सातारा-जावली मतदार संघाचे नेते अमित कदम, कोरेगाव तालुकाध्यक्ष शिवाजीराव महाडिक, बाबुराव सपकाळ, दत्तानाना ढमाळ, साधू चिकणे, प्रदीप विधाते, सुरेंद्र गुदगे, बंडा गोडसे, युवराज सुर्यवंशी, सरचिटणीस श्रीनिवास शिंदे आदी उपस्थित होते.यावेळी अजित पवार यांनी पक्षाच्या संघटनेचे अस्तित्व विधानसभांमध्ये दिसले पाहिजे, असे सांगून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन बळकट करण्याच्या सूचना प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यातील इतर मतदारसंघांमध्ये जरी राष्ट्रवादीचा आमदार नसला, तरी त्याठिकाणीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच निर्णय घेतला जाईल, अशा पद्धतीने कार्यकर्त्यांचे संघटन झाले पाहिजे. सध्या ‘लाडकी बहीण’ या योजनेसह अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा. संघटन मजबूत असल्यास हे काम चांगल्या पद्धतीने करता येईल, अशा सूचना त्यांनी दिल्या.

सातारा विधानसभेसाठी पदाधिकारी आग्रहीजागा वाटपात सातारा विधानसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी आग्रही मागणी पक्षाचे युवा नेते अमित कदम यांनी केली. यावर जागा वाटपाचा फॉर्म्युला सध्या तरी प्राथमिक स्वरूपात आहे. मात्र निवडणुकीपूर्वीचे सर्वेक्षण आल्यानंतर मेरीटप्रमाणे उमेदवारीचा निर्णय घेण्यात येणार आहे. तूर्तास तरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी संघटन वाढवावे, अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024