मका आहे बहुउपयोगी : खाण्याबरोबरच स्टार्च, कॉर्न पीठ, चायनीज, बेकरी प्रॉडक्टमध्ये वाढला वापर

By Admin | Updated: July 21, 2014 00:25 IST2014-07-21T00:18:34+5:302014-07-21T00:25:27+5:30

‘लोकमत’संगे जाणून घेऊ

Maize is very useful: Besides consumption of food, starch, corn flour, sugar, bakery products have increased use | मका आहे बहुउपयोगी : खाण्याबरोबरच स्टार्च, कॉर्न पीठ, चायनीज, बेकरी प्रॉडक्टमध्ये वाढला वापर

मका आहे बहुउपयोगी : खाण्याबरोबरच स्टार्च, कॉर्न पीठ, चायनीज, बेकरी प्रॉडक्टमध्ये वाढला वापर

सचिन भोसले -कोल्हापूर
जगात सर्वांत जास्त पिकविले जाणारे तिसऱ्या क्रमांकाचे पीक म्हणून मक्याकडे पाहिले जाते. असा हा मका आता सर्वांच्याच जीवनाचा भाग बनत चालला आहे. स्टार्च तयार करण्यासाठी व रोजच्या आहारातील बेकरी प्रॉडक्ट, चायनीज पदार्थ यामध्ये मका इतर पिठांना पर्यायी पीठ म्हणून उपयोगी होऊ लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कर्नाटकातून दररोज १२५ ट्रक मका विक्रीसाठी सांगलीच्या बाजारपेठेत येतो. यातील कोल्हापूरच्या बाजारात दररोज ४२ ट्रक मका येत आहे. असा हा बहुपर्यायी मका कसा आहे हे जाणून घेऊ ‘लोकमत’संगे .
मका सर्वांत प्रथम मेक्सिकोमध्ये सुमारे सात हजार वर्षांपूर्वी पिकवला गेला. सध्या अमेरिकेला मक्याचे कोठार म्हटले जाते. मध्य अमेरिकेत मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दैनंदिन खाण्यासाठी ताज्या स्वीट कॉर्नचा वापर केला जातो, तर वाळवलेला मका पीठ, लाह्या व इतर पदार्थांसाठी पिकविला जातो. मक्याचे तेल मोठमोठ्या कारखान्यांमध्ये वापरले जाते. तसेच मक्यापासून तयार होणारे कॉर्न स्टार्च याचा वापर कापडांमध्ये केला जातो. याचबरोबर कित्येक खाद्य कंपन्यांत ‘थिकनिंग एजंट’ म्हणजेच सॉस, पुडिंगसारखा प्रकारांमध्ये दाटपणा येण्यासाठी वापरले जाते.
कॉर्न स्टार्च हे सिरप म्हणूनही वापरले जाते. ज्याचा वापर साखरेलाही पर्याय म्हणून गोड पदार्थमध्ये वापरला जातो. बेबीकार्न हे प्रामुख्याने भाज्यांमध्ये, सॅलेडमध्ये वापरले जाते.

कर्नाटकातून येतो पश्चिम महाराष्ट्रात मका
४संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची मक्याची बाजारपेठ म्हणून सांगली पुढे येत आहे. हा जिल्हा कर्नाटक, आंध्र प्रदेशला जवळ असल्याने या भागातून मोठ्या प्रमाणात मका येतो.
४याचबरोबर कर्नाटकातून बनहट्टी, चिंचणी, नरगुद, हुबळी, बेळगाव, जमखंडी आदी भागांतून लाल मका विक्रीसाठी येतो. येथून हा मका कऱ्हाड, पुणे ग्रामीण भाग, सातारा, सांगली, कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या ठिकाणी मागणीप्रमाणे पाठविला जातो. उसामधील आंतरपीक म्हणून मका या पिकाकडे बहुतांशी शेतकरी पाहतात.
भारतातील मक्याच्या जाती अशा
४भारतात बीअर आईलंड, चिपवा फ्लिंट कॉर्न, ब्लॅक अ‍ॅझटेक, चिरुकी, लाँग हेअर पॉपकॉर्न, होपी ब्ल्यू कॉर्न, मनडन, ब्राईड कॉर्न, व्हाईट कॉर्न, स्वीट कॉर्न, लाल, या मक्याच्या जाती भारतीय बाजारपेठेत येतात. पश्चिम महाराष्ट्रात लाल मका प्रसिद्ध आहे.
जनावरांचे खाद्य म्हणूनही मका वापर
४वाळवलेल्या मक्यांचा वापर व्यावसायिक कारणांबरोबर पशुखाद्य म्हणूनही केला जातो. सध्या कुक्कुटपालनामध्ये कोबंडी खाद्य म्हणून मक्याला मोठी मागणी आहे. वर्षभराचे खाद्य हे पोल्ट्रीधारक खरेदी करतात. साधारण जानेवारी ते मे महिन्याअखेर ही खरेदी मोठ्या प्रमाणात होते.

तांबड्या मक्याला मोठी मागणी आहे. यामुळे दररोज १२५ ट्रक मका सांगलीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. एका ट्रकमध्ये साधारण १५ टन मका असतो. हा मका साधारण कोल्हापूर, सातारा, पुणे ग्रामीण भाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या भागात विक्रीसाठी पाठविला जातो. कोल्हापूरच्या बाजारपेठेत साधारण ४२ ट्रक मका पाठविला जातो. सर्वच खाद्यपदार्थांमध्ये मक्याच्या पिठाचा वापर वाढला आहे. त्यामुळे मक्याला मागणीही वाढली आहे. सध्या १४०० ते १५०० रुपये इतका क्विंटलला दर आहे.
- पोपटराव सावर्डेकर,
मका व्यापारी, सांगली

ताज्या मक्याला मोठी मागणी
सध्या पावसाळ्याच्या दिवसात स्वीट कॉर्न मक्याला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. साधारण एक किलो मका घेतल्यास ६० रुपये याप्रमाणे प्रतिकिलो दर येत आहे. याचबरोबर स्वीट कॉर्न मका कणीस याला दहा रुपये इतका प्रती नग दरही मिळत आहे. साध्या तांबड्या मका कणसाला प्रति नग २ रुपये याप्रमाणे दर मिळत आहे.
- युवराज बिसुरे, मका कणीस विक्रेता, कोल्हापूर

Web Title: Maize is very useful: Besides consumption of food, starch, corn flour, sugar, bakery products have increased use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.