शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Satara: सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:37 IST

पत्नीचा वाढदिवस अन् पतीवर अंत्यसंस्कार

कऱ्हाड/पाटण : मुंबई पोलिस दलात सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले तारळे (ता. पाटण) येथील महेंद्र दत्तात्रय जाधव यांचे पोलिस प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी तारळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.मूळचे पाटण तालुक्यातील तारळे गावचे रहिवासी असलेले महेंद्र जाधव हे १९९० मध्ये पोलिस दलात रुजू झाले होते. हवालदार या पदावर काम करत असताना त्यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली होती. बुधवारी सकाळी नायगाव येथे पोलिस प्रशिक्षण सुरू असताना त्यांना चक्कर आली. त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. गुरुवारी सकाळी तारळी नदीच्या काठावर उंब्रज पोलिस ठाण्याच्या वतीने मानवंदना देऊन त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिसी परंपरा जपणारे कुटुंब..देशसेवेचा ध्यास घेऊन त्यांचे वडील दत्तात्रय जाधव हेही पोलीस दलात सेवा बजावून २००० मध्ये सेवानिवृत्त झाले होते. तर तत्पूर्वीच त्यांनी मुलगा महेंद्र यास पोलिस दलात रुजू केले होते. एक प्रकारे तारळे येथील जाधव कुटुंबीय देशसेवेचा ध्यास घेतलेले कुटुंबच ठरले होते.

पत्नीचा वाढदिवस अन् पतीवर अंत्यसंस्कार..गेल्या आठवड्यात महेंद्र व त्यांच्या पत्नी नीता यांच्या लग्नाचा वाढदिवस जाधव कुटुंबीयांनी मोठ्या थाटात साजरा केला होता. तर गुरुवार, दि. १२ डिसेंबर रोजी पत्नी नीता यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्याचे नियोजन पतीने केले होते. मात्र, वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी महेंद्र जाधव यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशीच महेंद्र जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ जाधव कुटुंबीयावर आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसHeart Attackहृदयविकाराचा झटकाDeathमृत्यू