शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 11:11 IST

Ramraje Naik Nimbalkar : विधानसभा निवडणुकीपूर्वी फलटणचे रामराजे नाईख निंबाळकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. 

Ramraje Naik Nimbalkar ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. यापूर्वी फलटणच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. अजित पवार गटातील रामराजे नाईक निंबाळकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. काल फलटण येते त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले. यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खासदार शरद पवार आणखी एक धक्का देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

 काल रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पुढचा निर्णय काय घ्यायचा? असा सवाल केला. यावेळी कार्यकर्त्यांमधून 'तुतारी' साठी जल्लोष झाला.  यावेळी बोलताना नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर टीका केली. 

बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?

यावेळी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, मला काल काही चॅनेंलांचा फोन आला, त्यांनी विचारलं तुम्ही अजितदादांना सोडून तिकडे चालले आहे का? मला काय बोलायचं हेच सुचेना. ही चर्चाच झाली नाही, ही चर्चा राज्यभर पसरली. कदाचित आपल्याच विरोकांनी ही बातमी दिली असेल. मी तिकडे गेलो तर आपल्याला विधानसभेत कमळावर उभं राहता येईल असं त्यांना वाटत असेल, असा आरोपही नाईक निंबाळकर यांनी केला. आम्हाला काही प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत. मी कुठं जातोय याचा यांना काही फरक पडेल असं वाटत नाही. अजितदादांकडे जाण्याचा निर्णय पहिल्यांदा मी घेतला, असंही नाईक निंबाळकर म्हणाले. 

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, अजित पवार किती आक्रमक आहेत हे सगळ्यांना माहित आहे. अमित शाह यांनी जिल्हा बँकेच्या पंचाहत्तरीला येणार हे कबुल केले होते, पण कुठून फोन गेला आणि ते रद्द झाले. हे असं होणार असेल तर आम्ही कोणाला विचारायचं, असा सवालही रामराजे नाईक निंबाळकरांनी केला. 

'शरद पवारांना देव मानतो'

"मी शरद पवार यांना देव मानतो. तेवढंच अजितदादांनाही मानतो. अजितदादांमधील गुण आणि भविष्याचा विचार करुन आपण निर्णय घेतला. पण माझा कार्यकर्ता हा माझ्या राजकारणाचा नव्हे तर आयुष्याचा केंद्रबिंदु आहे. केंद्रबिंदु जोपर्यंत सुरक्षित राहत नाही, तोपर्यंत जमत नाही. आपलं भाजपासोबत भांडण नाही, असंही रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले. 

टॅग्स :Ramraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारRanjitsingh Nimbalkarरणजितसिंह निंबाळकर