नारायण राणेंना महाराष्ट्र विसरलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:36 IST2021-03-15T04:36:09+5:302021-03-15T04:36:09+5:30

कऱ्हाड : ‘नारायण राणे यांना महाराष्ट्र विसरलाय. त्यांच्याच पक्षातले त्यांना किंमत देत नाहीत. मग, मी बोलणे योग्य ठरणार नाही’, ...

Maharashtra has forgotten Narayan Rane | नारायण राणेंना महाराष्ट्र विसरलाय

नारायण राणेंना महाराष्ट्र विसरलाय

कऱ्हाड : ‘नारायण राणे यांना महाराष्ट्र विसरलाय. त्यांच्याच पक्षातले त्यांना किंमत देत नाहीत. मग, मी बोलणे योग्य ठरणार नाही’, अशा शब्दांत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नारायण राणेंची खिल्ली उडविली.

येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई बोलत होते.

या पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्री देसाई यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली, तर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतने ट्विट केले होते. यावर बोलताना देसाई म्हणाले, कंगना रनौतच्या ट्विटला किती महत्त्व द्यायचं, याचा विचार सर्वांनीच करायला हवा. महाराष्ट्रात राहायचं, करिअर करायचं. महाराष्ट्रातील लोकांच्या जीवावर मोठं व्हायचं आणि इथल्या पोलिसांवर, न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही म्हणायचं, हे अजब आहे. माझ्यावरील खटले हिमाचल प्रदेशमध्ये चालवा, असे म्हणणाऱ्या कंगना रनौतला महाराष्ट्र पोलिसांवर व सरकारवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.

या प्रकरणात पोलिसांचे नाव कोठेही मलिन झालेले नाही. महाराष्ट्र पोलीस योग्य पद्धतीने तपास करत असताना त्यांच्यावर अविश्वास दाखवून तपास इतरत्र देणे बरोबर नाही. केंद्राने केलेला हस्तक्षेप योग्य नाही, असेही देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

......................................................................

Web Title: Maharashtra has forgotten Narayan Rane