शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

महाराष्ट्रात भाजपने महिलांसाठी औद्योगिक धोरण आखलं : विजया रहाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 7:01 PM

रहाटकर म्हणाल्या, ‘३३ टक्के महिला आरक्षण आहेच; मात्र भाजप पक्ष नेहमीच कर्तृत्ववान महिलांच्या पाठीमागे उभा राहतो. सध्या विधानसभा निवडणुकीसाठीही सक्षम महिलांना अधिकाधिक उमेदवारीची संधी दिली आहे.

ठळक मुद्देमहिला औद्योगिक धोरण आखणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य आहे.

क-हाड : ‘केंद्र आणि राज्यात भाजप युती सरकारने चांगली कामगिरी केली आहे. महिला बचत गट, मुद्रा योजनेतून मिळणारे कर्ज, शाळकरी मुलींसाठी अस्मिता योजना अशा नारी शक्तीला अनेक पूरक योजना राबविल्या आहेत. महिला औद्योगिक धोरण आखणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य आहे. कर्तृत्ववान महिलांच्या पाठीशी पक्ष नेहमीच राहतो,’ अशी माहिती भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.

क-हाड येथील ‘नारीशक्ती विथ देवेंद्रभाऊ’ या कार्यक्रमासाठी रहाटकर आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी त्या बोलत होत्या. क-हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कविता कचरे, मुकुंद चरेगावकर, वैशाली मोकाशी, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

रहाटकर म्हणाल्या, ‘३३ टक्के महिला आरक्षण आहेच; मात्र भाजप पक्ष नेहमीच कर्तृत्ववान महिलांच्या पाठीमागे उभा राहतो. सध्या विधानसभा निवडणुकीसाठीही सक्षम महिलांना अधिकाधिक उमेदवारीची संधी दिली आहे. केंद्रात सहा महिला मंत्री आहेत. राष्ट्रीय सुरक्षा समितीत २ महिलांना भाजपने स्थान दिले आहे. भाजपमध्ये आमदार, खासदार महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महिलांना संधी देणारा पक्ष म्हणून याकडे पाहिले जाते. त्याचा फायदा पक्षाला नक्कीच होईल.

जनधन योजनेंतर्गत ३५ कोटी लोकांनी बँकेत खाती उघडली. त्यापैकी २० कोटी महिलांचा त्यामध्ये समावेश आहे. महिलांना प्रवाहात आणण्याचाच सरकारचा प्रयत्न आहे. ही बाब डोळसपणे अन् चौकसपणे पाहणाऱ्या महिलांच्या ध्यानात आली असून, सरकारच्या कामगिरीबाबत महिला समाधानी आहेत.मेधा कुलकर्णींच्या जबाबदारीचे स्वरूप बदलेल...मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी डावलून मंत्री चंद्रकांत पाटील कोथरूडमधून उभे राहत आहेत. महिलांचा सन्मान करण्याची हीच भाजपची पद्धत आहे का, याबाबत प्रश्न केल्यावर रहाटकर म्हणाल्या, कुलकर्णी यांच्यावर पक्ष अन्याय करीत नाही. त्यांच्या जबाबदारीचे स्वरूप फक्त बदलले जाईल. उमेदवारी हा पक्षांतर्गत प्रश्न आहे. माध्यमांनी याकडे चुकीच्या पद्धतीने पाहू नये.

टॅग्स :Vijaya Rahatkarविजया रहाटकरSatara areaसातारा परिसरBJPभाजपा