शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

सातारा जिल्ह्यात नऊ आमदार, कोणाची विकेट पडणार !; प्रतिष्ठेच्या लढाईमुळे संघर्षात वाढ

By नितीन काळेल | Updated: November 12, 2024 16:40 IST

फलटणमध्ये मतदारसंघात रामराजे नाईक-निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातच कस लागणार

नितीन काळेलसातारा : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ आल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून काही मतदारसंघात संघर्षाची स्थिती आहे. त्यातच जिल्ह्यातील आठ मतदारसंघात नऊ आमदार उतरले आहेत. यामधील कोणाची विकेट पडणार याकडेही लक्ष लागलेले आहे. यातील दोन आमदार तर कोरेगावात समोरासमोर असून प्रतिष्ठेची लढाई सुरू झालेली आहे.जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. या सर्वच मतदारसंघात एकूण १०९ उमेदवार रिंगणात उतरलेत. पण, खरी लढत महायुती आणि महाविकास आघाडीतच होत आहे. तरीही पाटण आणि वाई विधानसभा मतदारसंघात बंडखोरांनी रंगत आणली आहे. त्यामुळे संबंधित राजकीय गणिते बदलून कोणाचा फायदा करणार का, स्वत:च बाजी मारणार पाहणे महत्त्वाचे ठरलेले आहे.जिल्ह्यात आठही मतदारसंघात विद्यमान आठ आमदार लढा देत आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन आमदारांत काटे की टक्कर होत आहे. मागील निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा शिवसेनेकडून मैदानात उतरलेल्या महेश शिंदे यांनी पराभव केला. आता दोघेही पुन्हा समोरासमोर आलेत. शिंदेसेनेकडून आमदार महेश शिंदे रिंगणात आहेत. तर विरोधातील शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य आहेत.माणमध्ये भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्रभाकर घार्गे आहेत. घार्गेंच्या पाठीशी अनेक नेत्यांची ताकद उभी आहे. आमदार गोरे हे विकासकामे आणि पाणी प्रश्नांवर मतदारासमोर जात असले तरी त्यांच्यासाठीही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

सर्वच विद्यमान आमदारांपुढे यंदा आव्हान..कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसने माजी मुख्यमंत्री ही पृथ्वीराज चव्हाण यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. याठिकाणी भाजपचे अतुल भोसले यांचे आव्हान आहे.पाटण मतदारसंघात शिंदेसेनेचे पालकमंत्री शंभूराज देसाई हॅटट्रिकच्या तयारीत आहेत. येथे दोन सेना समोरासमोर आहेत. उद्धवसेनेकडून हर्षद कदम आहेत. तरीही महाविकास आघाडीतील बंडखोर सत्यजितसिंह पाटणकर यांनी पालकमंत्र्यांपुढे आव्हान उभे केले आहे. सातारा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उभे आहेत. विरोधात उद्धवसेनेने अमित कदम यांना उतरवले आहे. कदम यांना आघाडीची किती ताकद मिळणार यावर लढत अवलंबून आहे.वाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील पुन्हा मैदानात आहेत. विरोधात शरद पवार गटातून अरुणादेवी पिसाळ रिंगणात आहेत. मात्र, शिंदेसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी ताकद लावली आहे. त्यामुळे तिरंगी लढत आहे. फलटणमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार दीपक चव्हाण चौकार ठोकण्याच्या पवित्र्यात आहेत. विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सचिन कांबळे-पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. पण, या मतदारसंघात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातच कस लागणार आहे. दोघेही दोन उमेदवारांच्या पाठीशी आहेत. दोघांसाठीही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांचे अस्तित्व पणाला लागले आहे. विरोधातील भाजपच्या मनोज घोरपडे यांनी मोठे आव्हान उभे केलेले आहे. त्यातच आमदार पाटील यांच्याविरोधातील नाराजांची घोरपडे यांना रसद मिळू लागली आहे. यावरून सर्वच मतदारसंघात विद्यमान आमदारांना विरोधकांचे आव्हान आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराphaltan-acफलटणkarad-north-acकराड उत्तरkarad-south-acकराड दक्षिणwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024