शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: सातारा जिल्ह्यात ‘कांटे की टक्कर’; लोकसभेच्या मतदानावर विजयाचे गणित अवघड

By नितीन काळेल | Updated: November 16, 2024 19:20 IST

सातारा : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत महायुतीला आघाडी मिळाली होती; पण आताच्या विधानसभा निवडणुकीत सर्वत्रच ‘कांटे की ...

सातारा : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत महायुतीला आघाडी मिळाली होती; पण आताच्या विधानसभा निवडणुकीत सर्वत्रच ‘कांटे की टक्कर’ होत आहे. त्यातच दोन मतदारसंघांत अपक्षांनीही जोर लावला आहे. यामुळे महाविकास आघाडी तसेच महायुतीलाही विजयाचे गणित मांडणे अवघड झालेले आहे.सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात एकूण १०९ उमेदवार रिंगणात आहेत. यातील तब्बल ५७ जणांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. तरीही आठ मतदारसंघांत महाविकास आघाडी आणि महायुतीतच खरा सामना आहे; पण पाटण आणि वाईत आघाडी आणि युतीत बंडखोरी झाल्याने दोन्ही अपक्षांनी गणिते बिघडवलीत. त्याचा फायदा आणि तोटा कोणाला, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यातच मतदानाची तारीख जवळ आली असताना राजकीय घडामोडीही घडू लागल्या आहेत. त्यामुळे लोकसभेतील मतदानावर विजय-पराजयाचे गणित मांडणे अवघड आहे.सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात साताऱ्यातील माण आणि फलटण हे दोन विधानसभेचे मतदारसंघ येतात. माढ्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मताधिक्याने विजय मिळवला; पण त्यांना माण, फलटणमध्ये भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यापेक्षा कमी मते मिळाली. आता या दोनही मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांसाठी कांटे की टक्कर आहे. सरळसरळ युती आणि आघाडीच्या उमेदवारातच सामना आहे. त्यामुळे झुकते माप कोणाकडे सांगणे अवघड आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे गणित येथे जुळवणे कठीण झाले आहे. सातारा लोकसभा अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीत कोरेगाव, कऱ्हाड दक्षिण आणि सातारा विधानसभा मतदारसंघांत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना आघाडी होती. तर वाई, कऱ्हाड उत्तर आणि पाटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना मताधिक्य होते. यातील पाटण आणि वाईत युतीचे आमदार असतानाही आघाडीचे शशिकांत शिंदे हे आघाडीवर राहिले. तर कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही तेथे भाजपच्या उदयनराजेंना अधिक मते मिळाली. लोकसभेतील हे गणित आताच्या विधानसभा निवडणुकीत मांडणेही फसवे ठरणार आहे. कारण, पाटण, कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर आणि कोरेगाव, वाई मतदारसंघांत जोरदार चुरस आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024