शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बालेकिल्ला राखण्यासाठी शरद पवार मैदानात; दोन दिवस सातारा जिल्ह्यात

By नितीन काळेल | Updated: November 13, 2024 20:03 IST

शेवटच्या टप्प्यात सातारा स्वारी : आघाडीमुळे पाचच जागांवर लढण्याची वेळ

नितीन काळेलसातारा : विधानसभा निवडणुकीमुळे सभांचा जोर वाढत चालला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शेवटच्या टप्प्यात सातारा स्वारी करणार आहेत. यामध्ये एक दिवस मुक्काम असून, दोन दिवसांत तब्बल पाच सभा घेणार आहेत. यातून बालेकिल्ला पुन्हा राखण्यासाठी राजकीय खेळ्या होणार आहेत. तर राष्ट्रवादीवर आघाडीमुळे पाचच जागा लढविण्याची वेळ आली आहे.

सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला. पण, १९९५मध्ये प्रथमच विधानसभा निवडणुकीत तत्कालीन जावळी मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला, तर १९९९ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळेपासून जिल्ह्याने शरद पवार यांचीच पाठराखण केली. त्यामुळे सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला. पण, २०१९पासून बालेकिल्ल्याला भगदाड पडत गेले. आता राष्ट्रवादी आणि भाजपतच कोण वरचढ होणार याचीच स्पर्धा आहे.महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माण, फलटण, वाई, कऱ्हाड उत्तर आणि कोरेगाव हे पाच मतदारसंघ लढवत आहे. मागील वेळी सहा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार होते, तर एका ठिकाणी अपक्षाला पाठिंबा होता. यावेळी महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला जागा कमी आल्या. त्यातच राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्याने शरद पवार यांना सातारा जिल्ह्यात विशेष लक्ष द्यावे लागत आहे. यासाठी जिल्ह्यात दोन दिवस येत आहेत.या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला पूर्ण तयारी करावी लागत आहे. कारण, यावेळची निवडणूक शरद पवार गटासाठी आव्हान आहे. सर्वच मतदारसंघात काँटे की टक्कर आहे. यामुळे शरद पवार यांनाही विशेष लक्ष द्यावे लागत आहे. त्याची रणनिती ठरविण्यासाठीच दोन दिवसांचा वेळ जिल्ह्यासाठी दिल्याची चर्चा आहे.

पाच मतदारसंघात राजकीय ‘खेळी’ होणार !विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून शरद पवार साताऱ्यात आले नाहीत. शेवटच्या टप्प्यातच त्यांनी साताऱ्यावर स्वारी करण्याचे ठरविले आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्या सभांचे नियोजन झालेले आहे. यातून बालेकिल्ला पुन्हा राखण्यासाठीच त्यांची ही रणनिती असल्याचा अंदाज आहे. यासाठी ते १५ नोव्हेंबरला सातारा मुक्कामी आहेत. यावेळी कऱ्हाड उत्तर मतदारसंघात रहिमतपूरला सभा होईल. तसेच १६ नोव्हेंबरलाही ते वाई, कोरेगाव, दहिवडी आणि फलटण येथे चार सभा घेणार आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024