शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

Vidhan Sabha Election 2024: साताऱ्याच्या बालेकिल्ल्यावर महायुतीचे निशाण, कऱ्हाडचे दोन्ही तट ढासळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 15:47 IST

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा किल्ला भाजपने पूर्णपणे काबीज केला

सातारा : लाडक्या बहिणींची माया महायुतीला मिळाल्याचा फायदा राज्यासह सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांनाही मिळाला. सातारा, माण, वाई, पाटण, काेरेगावच्या जागांवरील वर्चस्व राखण्याबरोबरच महाआघाडीच्या कऱ्हाड उत्तर, दक्षिण आणि फलटणच्या गडांना ही खिंडार पडले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा किल्ला भाजपने पूर्णपणे काबीज केला आहे. सर्व आठही जागांवर मोठ्या फरकाने महायुतीने विजय मिळवला आहे.सातारा विधानसभा निवडणुकीला महायुतीतून भाजपने कऱ्हाड उत्तर, दक्षिण, सातारा आणि माण मतदारसंघातून उमेदवार दिले, तर पाटण, कोरेगावची जागा शिंदेसेनेने लढवली. वाई आणि फलटणची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लढवली.कऱ्हाड उत्तरमध्ये प्रथमच भाजपचा विजय झाला आहे. याठिकाणी मनोज घोरपडे यांनी १,३४,६२६ मते मिळवली, तर बाळासाहेब पाटील यांना ९०,९३५ मते मिळाली. घोरपडे यांनी ४३,६९१ मतांनी विजय मिळवत बाळासाहेबांची कऱ्हाड उत्तर मधील पाटीलकी संपुष्टात आणली. कऱ्हाड दक्षिणमध्ये भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ३९,३५५ मतांनी पराभव करत विजय मिळवला. अतुल भोसले यांना १,३९,५०५ मते, तर पृथ्वीराज चव्हाण यांना १,००,१५० मते मिळाली.माण मतदारसंघात भाजपच्या जयकुमार भगवान गोरे यांना १,५०,०२१ मते मिळाली, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रभाकर घार्गे यांना १,००,३४६ मते मिळाली. जयकुमार गोरे यांनी ४९,६७५ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. साताऱ्यात भाजपच्या शिवेंद्रराजेंनी तब्बल १ लाख ४२ हजार १२४ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. साताऱ्यात शिवेंद्रराजेंना १,६७,८४९, तर अमित कदम यांना ३४,७२५ मते मिळाली. शिवेंद्रराजे भोसले यांचा १,४२,१२४ मतांनी विजय झाला.फलटणला राष्ट्रवादीचे सचिन पाटील यांना १,१९,२८७ तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या दीपक चव्हाण यांना १,०२,२४१ मते मिळाली. सचिन पाटील यांनी १७ हजार ४६ मतांनी विजय मिळवला. वाईमध्ये राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील यांनी ६१,३९२ मताधिक्याने विजय मिळविला. त्यांना १,४०,९७१, तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ यांना ७९,५७९ मते मिळाली.शिंदेसेनेच्या दोन्ही जागांवर वर्चस्व अबाधितकोरेगाव मतदारसंघात महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा थेट ४५ हजार ६३ मतांनी पराभव केला. महेश शिंदे यांना १ लाख ४६ हजार १६६ मते मिळाली, तर आमदार शशिकांत शिंदे यांना १ लाख १ हजार १०३ मते मिळाली. पाटणमध्ये शंभूराज देसाई यांनी ३४,८२४ मताधिक्याने विजय मिळवला. देसाई यांना १,२५,७५९, तर अपक्ष सत्यजितसिंह पाटणकर यांना ९०,९३५, तर उद्धवसेनेच्या हर्षद कदम यांना ९,६२६ मते मिळाली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024satara-acसाताराkarad-south-acकराड दक्षिणkarad-north-acकराड उत्तरMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024