शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

“महाराज, आता तिकीट द्या… नाहीतर दोरी द्या"; खासदार उदयनराजे यांच्याकडे समर्थकाची अजब मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 15:23 IST

राज्यात जिल्हा परिषदा पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सातारा जिल्ह्यातही राजकीय मोर्चेंबांधणीला सुरूवात झाली आहे, यामध्ये प्रत्येक इच्छुक उमेदवार पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

राज्यात जिल्हा परिषदा पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सातारा जिल्ह्यातही राजकीय मोर्चेंबांधणीला सुरूवात झाली आहे, यामध्ये प्रत्येक इच्छुक उमेदवार पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर हे मसूर जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहेत.

जयशंकर यांच्या समोर येताच पोलिश परराष्ट्रमंत्र्यांनी माघार घेतली; पाकिस्तानमध्ये जाऊन काश्मीरवर केले होते भाष्य

याआधी झालेल्या निवडणुकांमध्ये कुलदीप क्षीरसागर यांनी उदयनराजे यांच्या निवडणुकीची धुरा समर्थपणे सांभाळली होती. तसेच मागील विधानसभेच्या निवडणुकीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, उदयनराजे यांच्या शब्दाला मान देत त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती.

या पार्श्वभूमीवर कुलदीप क्षीरसागर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपल्या उमेदवारीची मागणी उदयनराजे यांच्याकडे केली. यावेळी उदयनराजे यांच्याशी बोलताना त्यांनी, “आता उमेदवारी द्या, नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या”अशी अजब टिप्पणी केली. ही टिप्पणी ऐकून उदयनराजे यांनाही हसू आवरता आले नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

जिल्हा परिषद नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

 राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. जिल्हा परिषेदेच्या निवडणुकीसाठी १६ जानेवारी २०२६ रोजी सूचनेचे प्रकाशन होणार आहे. अर्ज दाखल करण्याची दाखल १६ जानेवारी ते २१ जानेवारी अशी मुदत असणार आहे.  उमेदवारी माघारीची अंतिम मुदत २७ जानेवारी २०२६ तर अंतिम उमेदवारी व निवडणूक चिन्ह वाटप २७ जानेवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत असणार आहे. मतदानाचा दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ सकाळी ६.३० ते सायंकाळी ५.३० मतमोजणीचा दिनांक ७ फेब्रुवारी होणार आहे.

या निवडणुकांसाठी १ जुलैची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी २५ हजार ४८२ मतदान केंद्र असमार आहेत. तसेच १ लाख १० हजार ३२९ बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Give ticket or rope to hang myself: Supporter tells MP

Web Summary : Udayanraje Bhosale's supporter Kuldeep Kshirsagar demands ticket for Zilla Parishad elections. Frustrated, he jokingly asks for a rope if denied candidacy. Local elections announced.
टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Satara areaसातारा परिसरBJPभाजपा