शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर नगरपालिका : कचरा डेपोतील कचरा ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 11:28 IST

Mahabaleshwar Hill Station Garbage Satara- स्वच्छता अभियानात अव्वल आलेल्या महाबळेश्वर नगरपालिकेचा कचरा डेपोवर टाकण्यात आलेल्या ओल्या कचरा हा जंगलातील प्राण्यांबरोबरच पाळीव गाईंसाठी जीवघेणा ठरत आहे. ओल्या कचऱ्याबरोबरच प्लास्टिकही गाई खात असल्याने त्यांना अनेक रोगांनी पछाडलेले आहे. यापैकी अनेक गाई मृत्युशी झुंज देत आहेत.

ठळक मुद्देमहाबळेश्वर नगरपालिका : कचरा डेपोतील कचरा ठरतोय जीवघेणा अनेक जनावरं देताहेत मृत्यूशी झुंज

महाबळेश्वर : स्वच्छता अभियानात अव्वल आलेल्या महाबळेश्वर नगरपालिकेचा कचरा डेपोवर टाकण्यात आलेल्या ओल्या कचरा हा जंगलातील प्राण्यांबरोबरच पाळीव गाईंसाठी जीवघेणा ठरत आहे. ओल्या कचऱ्याबरोबरच प्लास्टिकही गाई खात असल्याने त्यांना अनेक रोगांनी पछाडलेले आहे. यापैकी अनेक गाई मृत्युशी झुंज देत आहेत.महाबळेश्वर पालिकेचा कचरा डेपो हा शहरापासून काही किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिग लागले आहेत. महाबळेश्वर पालिका ओला आणि सुका कचरा वेगळा वेगळा गोळा करते? परंतु टाकताना तो एकाच जागेवर टाकला जातो आहे. ओल्या अथवा सुक्या अशा कोणत्याही प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही.

रोज कित्येक टन कचरा गोळा होतो व हा सर्व कचरा हा कारवी आळा कचरा डेपोवर गोळा केला जातो. या ठिकाणी टाकण्यात येणारा ओला कचरा हा जंगलातील प्राण्यांचा पशुपक्षांचा तसेच या परीसरातील पाळीव गाईंचे खाद्य बनले आहे. असा ओला कचरा हा नासुन जातो तर काही वेळेला अशा ठिकाणी किडे पडतात. सडलेला कचरा खावुन अनेक गाईंना आपले प्राण गमवावे लागले आहेत अशा घटना वरचेवर येथे घडत असतात.

आजही येथे मोठ्या प्रमाणावर मोकाट गाई या ठिकाणी कचरा खाण्यासाठी गोळा होतात. या ठिकाणी येणाऱ्या अनेक गाईंना अनेक व्याधींनी पछाडलेले आहे. अनेक गाई या मृत्युशी झुंज देत आहेत. कचऱ्यावर प्रक्रिया करणारे येथे युनिट पालिकेने बसविले आहेत. परंतु ये युनिट कित्येक महीन्यापासून बंद पडले आहेत.

बंद स्थितीत राहील्याने हे युनिट गंजले आहेत. आता पालिकेने नविन युनिट येथे आणून बसविले आहे. परंतु ते सुरू करण्यास पालिकेला मुहूर्त सापडला त्यामुळे पालिका नेमके काय काम करते? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. घनकचरा व्यवस्थापनावर पालिकेचे करोडो रूपये खर्च होतात हा खर्च नेमका कशावर खर्च होतो हे समजू शकले नाही.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नwildlifeवन्यजीवSatara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान