मधुमिताच्या ‘राईसप्लेट’ शॉर्टफिल्मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट विनोदी शॉर्टफिल्मचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:03+5:302021-06-23T04:25:03+5:30
सातारा : येथील मधुमिता अभिजित वाईकर दिग्दर्शित ‘राईस प्लेट’ या विनोदी शॉर्टफ़िल्मला इंडियन स्टार इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट ...

मधुमिताच्या ‘राईसप्लेट’ शॉर्टफिल्मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट विनोदी शॉर्टफिल्मचा पुरस्कार
सातारा : येथील मधुमिता अभिजित वाईकर दिग्दर्शित ‘राईस प्लेट’ या विनोदी शॉर्टफ़िल्मला इंडियन स्टार इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट विनोदी शॉर्टफिल्मचा पुरस्कार मिळाला.
मधुमिता कला अकादमी संचलित अभिव्यक्त अभिनय व नृत्य शाळेतर्फे निर्माण केली आहे.
कलाशिक्षक, नाटककार अभिजित वाईकर व रंगकर्मी-शिक्षिका शिल्पा वाईकर यांची कन्या मधुमिताला कलेचा वारसा जन्मतःच मिळाला आहे. मधुमिताने आजपर्यंत ''कधी उलट कधी सुलट'' व ''नाथ हा माझा'' या व्यावसायिक नाटकांत अभिनय केला आहे. ''शाळा'', झोका, गुगलगाव वाय फाय, जीएफबीएफ या वेबसिरीज, ''बुमरँग, कंपाउंड्स, उम्मीद'' सारखे लघुपट, ''वुई द विनर्स'', ''हॅलो'' इत्यादी एकांकिका व बालरंगभूमीवरील बालनाट्य, नाटिकापासून २ अंकी ५ मराठी-हिंदी नाटकात अभिनय, दिग्दर्शन, संकलन, संगीत संयोजन अशा सर्व तांत्रिक बाबींवर काम करण्याचा तिला बालपणापासून अनुभव आहे.
तिने पुणे बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेजला बी. एस. सी. अॅनिमेशन केले आहे.
अंधश्रद्धेवर भाष्य करणाऱ्या अशा ‘झोका’ या डॉ. राजेंद्र माने लिखित फिल्मचे तिने दिग्दर्शन केले. या फिल्मला रसिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ''बॉडी नं.१३ '' या थरार फिल्ममध्ये देखील तिने मध्यवर्ती भूमिका साकारत मेकअप कलादेखील शिकून घेतली.
राईसप्लेट या शॉर्टफिल्ममध्ये खाद्य संस्कारातील अनावश्यक दिखाऊपणा, सोपस्कार यावर मार्मिक भाष्य केले आहे व पोटाच्या भुकेसाठी आवश्यक दोन घासांची किंमत काय असते याबाबतचा मिस्कीलपणे संदेश ही शॉर्टफिल्म देते.