शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
3
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
4
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
5
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
6
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
7
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
8
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
9
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
10
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
11
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
12
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
13
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
14
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
15
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
16
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
17
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
18
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
19
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
20
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका

माढा लोकसभा मतदारसंघ :महायुतीचं ठरलं; आघाडीतील इच्छुक देव पाण्यात घालून...

By नितीन काळेल | Published: March 22, 2024 7:46 PM

Madha Lok Sabha Constituency: माढा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीने उमेदवार जाहीर करुन पुढचे पाऊल टाकले असलेतरी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजुनही कोणाचेच नाव स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर रासपचे महादेव जानकर यांनाही अजून आघाडीत घेणार की नाही हे ही निश्चीत नाही.

- नितीन काळेलसातारा - माढा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीने उमेदवार जाहीर करुन पुढचे पाऊल टाकले असलेतरी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजुनही कोणाचेच नाव स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर रासपचे महादेव जानकर यांनाही अजून आघाडीत घेणार की नाही हे ही निश्चीत नाही. त्यामुळे आघाडीकडून इच्छुक असणारे देव पाण्यात घालून बसले आहेत.

माढा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत तीन निवडणुका झाल्या आहेत. आताची निवडणूक चाैथी असलीतरी उमेदवारीवरुनच चर्चा झडू लागल्या आहेत. महायुतीतून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली. पण, त्यांच्या विरोधात महायुतीतूनच उठाव झाला आहे. तरीही खासदारांनी या नाराजीकडे डोळेझाक करुन प्रचाराला सुरूवात केली आहे. तर भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांचीही नाराजी दूर झालेली नाही. त्यामुळे त्यांनीही मतदारसंघात गावभेटी सुरू ठेवल्यात. असे असतानाच महाविकास आघाडीचा उमेदवार अजून निश्चित नाही. त्यातच माढा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडेच राहणार आहे. तरीही त्यांनी अजून कोणालाही हिरवा कंदील दाखवलेला नाही.

आघाडीतील शरद पवार गटाकडून अभयसिंह जगताप यांनी दोन महिन्यांपासून तयारी केलेली. मतदारसंघात अनेक कार्यक्रम घेतले. सध्याही त्यांच्या गावभेटी सुरू आहेत. पण, त्यांनाही अजून शरद पवार यांनी वेटींगवर ठेवलेले आहे. त्यातच सध्या महायुतीत खासदारांच्या उमेदवारीवरुन नाराजीनाट्य सुरू आहे. यामधूनच कोणी राष्ट्रवादीत येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळेही शरद पवार यांनी उमेदवार देण्याची गडबड केली नसल्याची माहितीही समोर येत आहे. कारण, आज शरद पवार गटाकडे माढ्याततरी एकही ताकदवान उमेदवार नाही. मतदारसंघातील सर्व आमदार हे महायुतीत आहेत. अशावेळी शरद पवार हे महायुतीतील नाराजांना बरोबर घेऊन तुल्यबळ लढत घडवू शकतात. यासाठी त्यांनी सध्यातरी शांततेचे धोरण स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे रासपचे महादवे जानकर आणि शरद पवार यांच्यात अनेकवेळा माढा मतदारसंघासाठी भेट झाली आहे. तरीही जानकर यांना ठामपणे काहीच आश्वासन मिळाले नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या मनात काय ? हे समजाण्यासाठी अजून काही दिवस जावे लागणार हे निश्चीत. जानकर माढ्यात उतरणे महायुतीसाठी ठरणार धक्का आघाडीबरोबर जाऊन रासपचे महादेव जानकर माढ्यातून लढण्याची अधिक शक्यता आहे. पण, चर्चेशिवाय पुढे काहीच होत नाही. शुक्रवारीही शरद पवार यांनी माढ्याची जागा जानकर यांनी लढावी, अशी माझी वैयक्तीक मागणी आहे, असेही स्पष्ट केले. पण, मागील १५ दिवसांपासूनच्या राजकीय घडामोडी पाहता माढ्याबाबत पवार यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मतदारसंघ त्यांच्याकडेच राहणार असलातरी त्यांच्या मनात काय चालले आहे, हेच समजणे अवघड झाले आहे. तरीही महादेव जानकर आघाडीत जाऊन लढल्यास महायुतीसाठी हा मोठा धक्का ठरणार हे स्पष्ट आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४madha-pcमाढाSharad Pawarशरद पवार