शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

माढ्यात निशाना लागेना; साताऱ्यात थांबा अन् पाहा...

By नितीन काळेल | Updated: April 6, 2024 19:37 IST

अर्ज भरण्याची वेळ जवळ : लोकसभा उमेदवार निवडीला गुढीपाडव्याचा मुहूर्त लागणार !

सातारा: लोकसभेसाठी अर्ज भरण्याची वेळ जवळ आली असतानाही सातारा आणि माढा मतदारसंघातील चित्र स्पष्ट नाही. आघाडीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे दोन्हीही मतदारसंघ असतानाही त्यांचा बरोबर निशाणा लागलेला नाही. तर महायुतीत सातारा कोणाकडे हे ठरले नाही. त्यामुळे सर्वांनाच उमेदवारांची प्रतीक्षा असून गुढीपाडव्यावेळीच मुहूर्त लागण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे. याचा प्रत्यय आता लोकसभा निवडणुकीमुळे येऊ लागलाय. कारण, महायुतीत अजूनही मतदारसंघ कोणाकडे यावरूनच रस्सीखेच पहायला मिळत आहे. तर आघाडीत बऱ्यापैकी एकसंधता असतानाही उमेदवार ठरविण्यावरून मागे-पुढे पाहिले जात आहे. यामुळे अनेक मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाही. यामध्ये सातारा आणि माढा मतदारसंघाचा समावेश आहे.

सातारा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे आहे. पण, आताच्या निवडणुकीत प्रथमच उमेदवार ठरविताना पवार यांना विचार करावा लागत आहे. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणावरून माघार घेतली असल्याने कोणाला रिंगणात उतरवयाचे यावरच खल सुरू आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित राखायचा असेल तर महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देणाराच उमेदवार उतरवावा लागणार आहे. त्यामुळेच महायुतीत मतदारसंघ कोणाकडे जातो आणि उमेदवार कोण यावरच ते गणित मांडू शकतात. यासाठी तरी पवार यांनी उमेदवार जाहीर केला नसावा ना, अशी शंका येत आहे. तरीही राष्ट्रवादीकडून सध्यातरी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव चर्चेत आहे.

महायुतीत भाजप का राष्ट्रवादीचा अजित पवार गट साताऱ्याची निवडणूक लढविणार हा पेच संपलेला नाही. दोघांनाही सातारा मतदारसंघ हवा आहे. भाजपला मतदारसंघ सुटण्याची चिन्हे असली तरी राज्यातील इतर मतदारसंघांचा तिढा सुटल्याशिवाय सातारा कोणाकडे जाणार हे ठरणार नाही. त्यामुळे सध्या साताऱ्याबाबतही महायुतीत प्रतीक्षा आहे. पण, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मतदारसंघात भेटी सुरू केल्या आहेत. तर अजित पवार गट शांततेत असल्याचे दिसून येत आहे. तरीही १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच म्हणजे गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून उमेदवार जाहीर होतील, अशी नवी माहिती समोर येत आहे.

गळ लागला की माढ्याचा उमेदवार ठरणार...माढा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन आघाडी घेतली. पण, घरातूनच उमेदवारीला विरोध झालाय. भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील वेगळ्या वाटेवर जाण्याची चिन्हे आहेत. त्यातच महायुतीतीलच रामराजे नाईक-निंबाळकर हेही मोहिते यांच्याबरोबर आहेत. यामुळे माढ्यात वेगळंच राजकारण रंगू लागले आहे. या घडामोडीकडे शरद पवार हेही लक्ष ठेवून आहेत. त्यांनाही मतदारसंघात तगड्या उमेदवाराची गरज आहे. असा उमेदवार अकलूजच्या मोहिते-पाटील किंवा फलटणच्या रामराजे यांच्या घरातूनच मिळू शकतो, हेही स्पष्ट आहे. त्यामुळे पवार हे अशा उमदेवारासाठी गळ टाकून आहेत. गळ लागला तर ठीक नाहीतर दुसरे पर्यायही त्यांनी समोर ठेवल्याची माहिती मिळत आहे. अशा कारणातूनच अजूनही राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित झालेला नाही.

टॅग्स :satara-acसाताराsatara-pcसाताराmadha-acमाढाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४