शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

पावसाचा जोर ओसरला, कोयनेचे दरवाजे बंद!, धरणात ९६ टीएमसी पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 14:08 IST

पावसाचा जोर ओसरल्याने दहा दिवसांनी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

प्रमोद सुकरेकराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने काल, सोमवारी सायंकाळी धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत. सध्या पायथा वीज गृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात प्रतिसेकंद १३,८१४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पावसाचा जोर आणि आवक कमी झाल्याने नद्यांची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे.कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाल्यानंतर धरण व्यवस्थापनाने दि. ११ ऑगस्ट रोजी पायथा वीजगृह कार्यान्वित करून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (दि. १२ ऑगस्ट) धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उघडून ८००० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले होते. १५ ऑगस्ट नंतर दरवाजे साडे चार फुटांनी उघडण्यात आले होते. पायथा वीजगृह आणि दरवाजांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करता आली. पावसाचा जोर ओसरल्याने दहा दिवसांनी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.कोयना धरणात सध्या ९६.११ टीएमसी पाणीसाठा असून धरण ९१ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे. धरणात १३,८१४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू ठेवला आहे. सोमवारी दिवसभरात कोयनानगर आणि नवजा येथे प्रत्येकी २१ मिलीमीटर, तर महाबळेश्वर येथे ५१ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण