गुणाजी दिसेनात; आता बांदेकरांची प्रतीक्षा

By Admin | Updated: January 20, 2015 23:35 IST2015-01-20T20:31:37+5:302015-01-20T23:35:43+5:30

महाबळेश्वर : सत्ता बदलताच ‘जाहिरातबाजी’साठी नव्या अभिनेत्याची चर्चा

Looked at Gunaji; Now waiting for Bandekar | गुणाजी दिसेनात; आता बांदेकरांची प्रतीक्षा

गुणाजी दिसेनात; आता बांदेकरांची प्रतीक्षा

अजित जाधव -महाबळेश्वर -महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिध्द असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये दरवर्षी १५ लाख पर्यटकांचा पाहुणचार करण्यात येतो. परंतु नगर पालिकेकडून व नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांनी २५ लाख पर्यटक आकडा गाठण्यासाठी आता अभिनेता आदेश बांदेकर यांना पाचरण केले आहे.पालिकेकडून महाराष्ट्र व गुजरात या भागातील पर्यटकांची रेलचेल असली तरी प्रचार आणि प्रचाराअभावी दक्षिण आणि उत्तरेकडील राज्यात महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात नाही. या पार्श्वभूमीवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाबळेश्वर नगरपालिकेने मराठी चित्रपट अभिनेता मिलिंद गुणाजी यांना महाबळेश्वरचे ब्रँड अबॅसिडर करण्यात आले आहे.यासाठी पालिकेने विशेष मोहीम राबविण्याची गरज असल्याचे तत्कालीन पर्यावरण सचिव येथे आयोजित केलेल्या बैठकीत नमूद केले होते व यासाठी त्यांनी पािलकेला वर्षभराच्या कार्यक्रमासाठी २० लाखांचा निधी मंजूर केला होता. पर्यावरण सचिवाच्या सूचनेप्रमाणे पालिकेने तात्काल पर्यावरणाबाबत जागृती करण्याची मोहीम हाती घेतली. यासाठी पुणे येथील शास्वत इको सोल्युशन फाऊंडेशन या संस्थेशी करार केला. करारानुसार जनजागृती मोहीमेचा आज शुभारंभ नगराध्यक्ष उज्ज्वला तोष्णिवाल यांच्या हस्ते येथील सुभाष चौकात करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, उपनगराध्यक्ष संतोष आखाडे, नगरसेवक संतोष शिंदे, नगरसेविका फेनिदा वलगे, सुरेखा आखाडे, मुख्याधिकारी सचिन पवार, अरुण वायदंडे उपस्थित होते. यावेळी गिरिस्थान प्रशाला व कनिष्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्ये सादर केले.मिलिंद गुणाजी यांच्या महाबळेश्वर माहितीबाबतच्या सीडीज् बाजारपेठेत विकण्यास ठेवण्यात येणार आहेत. १० ते १५ सेकंदाची व्हिडिओ चित्रीकरण प्रत्येक न्यूज चॅनलला देण्यात येणार आहेत व यामुळे महाबळेश्वर शहरात मिलिंद गुणाजी बाबत कॉल फॉर आयडीयाज्च्यावतीने आदेश बांदेकरही जनजागृती मोहिमेमध्ये दिसून येणार आहेत.

असे असणार कार्यक्रम
१ वर्षभर राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाबाबत शहरातील प्रत्येक विविध सेवाभावी संघटना, संस्था यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. यामध्ये शहरात प्लॅस्टिक व कचरा मुक्त करणे, संदेश देणारे सूचना फलक लावणे, विविध स्पर्धात्मक कार्यक्रम राबवणे, कचरा, डबे लावणे, रॅली काढून जनजागृती करणे, प्रिंट मिडियाचे सहकार्याने मोहीम सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
२पर्यटकांशी थेट संपर्क येत असणाऱ्या सर्व संघांना एकत्र बोलवून त्यांना सूचना करण्यात येणार आहेत. यामध्ये टॅक्सी चालक, घोडेवाले, व्यापारी, टपरीधारक, विविध सेवाभावी संघटना यांच्या बैठकी घेण्यात येणार आहेत.
३कचरा करू नये, यासाठी नागरिकांना व पर्यटकांना प्रवृत्त करण्यात येणार आहे.

पर्यावरणाविषयी जनजागृती
महाबळेश्वरमध्ये शाश्वत इको सोलूशन फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने माहिती व शिक्षण याद्वारे पर्यावरण बाबीची शहरात जनजागृती मोहीम कॉल फॉर ग्रीन आयडीयाज या वर्षभरात राबविण्यात येणार आहेत. यामध्ये कॉल फॉर आयडीया या उपक्रमामध्ये अभिनेता मराठी आदेश बांदेकर यांचा सहभाग करून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Looked at Gunaji; Now waiting for Bandekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.