केरळच्या मदतीला लोणंदकर धावले सामाजिक संघटना, संस्था : वस्तूरुपी मदत, तासात लाखोंची मदत गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 10:41 PM2018-08-24T22:41:33+5:302018-08-24T22:42:07+5:30

Lonandar run for Kerala's help; Social organizations, organizations: Vocational help, millions of help collected in the hour | केरळच्या मदतीला लोणंदकर धावले सामाजिक संघटना, संस्था : वस्तूरुपी मदत, तासात लाखोंची मदत गोळा

केरळच्या मदतीला लोणंदकर धावले सामाजिक संघटना, संस्था : वस्तूरुपी मदत, तासात लाखोंची मदत गोळा

googlenewsNext

लोणंद : शहरामध्ये अनेक वर्षांपासून शेकडो केरळमधील बांधव वास्तव्यास आहेत. त्यांच्या प्रयत्नातून
लोणंदमध्ये सेंट अ‍ॅन्स इंग्लिश मीडियम स्कूल चालवले जाते. लोणंदकरांना या शाळेचा अभिमान आहे. त्यांच्या परम प्रसाद चॅरिटेबल ट्रस्टने मदतीचे आवाहन करताच शेकडो लोणंदकरांचे मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.

सतत कोसळणारा पाऊस आणि महापुरामुळे केरळमध्ये गेल्या शंभर वर्षांतील सर्वाम मोठी जीवितहानी झाली आहे. या महापुरात आतापर्यंत ३५० नागरिकांचा मृत्यू झाला असून, जवळपास सव्वादोन लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. याआधी १९२४ मध्ये केरळमध्ये अशी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली होती.

केरळकर लोणंदकरांच्या प्रत्येक सुखदु:खात सहभागी होतात. केरळ राज्यावर आलेल्या संकटामुळे लोणंदकरही त्यांच्या मदतीला धावले आहेत. यामध्ये लोणंदमधील रोटरी क्लब, इलरव्हिल क्लब, लोकसेवा प्रतिष्ठान, लोणंद मेडिकल असोसिएशन, नीरा येथील मैत्रय फाउंडेशन, जेजुरी, लोणंद व नीरा येथील व्यापारी बांधव आणि सामाजिक संस्थांनी मिळून लाखो रुपयांची जीवनावश्यक वस्तू, चादरी, धान्य, कपडे, औषधांचा साठा केरळकडे रवाना क रण्यासाठी लोणंद येथील परम प्रसाद चॅरिटेबल ट्रस्टचे फादर अ‍ॅन्टो फुवा, रॉजन जॉन, मिन्स जोसेफ यांच्याकडे देण्यात आला आहे.

सध्या केरळची परिस्थिती ही चिंताजनक अतंत्य गंभीर आहे. या परिस्थितीमध्ये अनेकांनी आपले जीव गमावले आहे. तसेच आपला संसार ही पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. या लोकांना संपूर्ण महाराष्ट्रातून मदत केली जात आहे. अशी मदत लोणंदमधील नागरिकांनी केली आहे.

लोणंदमध्ये काही तासात लाखो रुपयांची मदत गोळा
लोणंदमधील प्रसिद्ध कापड विक्रेते यांनी तर सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची कपडे व महिला व पुरुषांची अंतरवस्त्रे पाठविली असून, नाव प्रसिद्ध करण्यास नकार दिला आहे. लोणंद शहरात अनेक दानशूर व्यापारी, डॉक्टर व व्यावसायिक, सामाजिक संस्था असून, संकटाच्या काळात नेहमीच लोणंद शहर पुढे आलेले आहे. केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचे अवाहन करताच लाखो रुपयांची मदत काही तासांतच गोळा झाली.

 

Web Title: Lonandar run for Kerala's help; Social organizations, organizations: Vocational help, millions of help collected in the hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.