शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

लोणंद नगरपंचायतीचा मार्ग मोकळा!

By admin | Updated: August 22, 2015 00:56 IST

ग्रामविकासमंत्र्यांची स्वाक्षरी : श्रेयवादाच्या वादातील फाईल ‘भाजप’च्या प्रयत्नामुळे उघडली

लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या मंजुरीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून मार्गी लागलेला नव्हता. श्रेयवादाच्या वादात अडकलेली ही फाईल ‘भाजप’च्या प्रयत्नामुळे पुन्हा उघडली असून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रस्तावावर नुकत्याच सह्या केल्या आहेत. त्यामुळे लोणंद नगरपंचायतीचा मार्ग खुला झाला आहे. लोणंद ग्रामपंचायतीची सत्ता जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांच्याकडे असताना लोणंदच्या विकासातील निधीचे अडथळे दूर व्हावेत, लोणंद नगरपंचायत व्हावी म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद नगरपंचायत होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्यावेळी पंचायत समिती, जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे असतानाही लोणंद नगरपंचायत होण्यासाठी त्यांनी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले होते. त्यावेळी लोणंद नगरपंचायत कसल्याही परिस्थितीत व्हावी म्हणून सर्वांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले असताना केवळ श्रेयवादापायी लोणंद नगरपंचायतीच्या फाईलची अडवाअडवी तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केली होती. त्यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण या प्रस्तावासाठी अनुकूल असतानाही नगरपंचायतीचा निर्णय झाला नव्हता. त्यानंतर लोणंद नगरपंचायतीबाबत आजपर्यंत उलटसुलट चर्चा सुरू होती. राज्यामध्ये भाजप-सेनेचे सरकार आल्यापासून लोणंद पंचायत समितीचे माजी सभापती विनोद क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शेळके, नारायण साळुंखे, सुभाष क्षीरसागर, तुकाराम क्षीरसागर, शिरीष मेहता यांनी लोणंद नगरपंचायत व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसत असून, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावावर सही केली आहे. यामुळे नगरपंचायतीचा मार्ग खुला झाल्याचे लोणंद भाजपच्या वतीने सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)