‘लोकमत’ची पत्रकारिता विश्वासार्ह

By Admin | Updated: November 5, 2015 23:56 IST2015-11-05T22:39:52+5:302015-11-05T23:56:08+5:30

शिवेंद्रसिंहराजे भोसले : ‘दीपोत्सव २०१५’चे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन

'Lokmat' journalism is trustworthy | ‘लोकमत’ची पत्रकारिता विश्वासार्ह

‘लोकमत’ची पत्रकारिता विश्वासार्ह

सातारा : ‘बातम्यांद्वारे दिशाभूल करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असताना ‘लोेकमत’मधील बातमीवर ठामपणे विसंबून राहावे, अशी विश्वासार्हता ‘लोकमत’ने जपली आहे,’ असे उद््गार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव २०१५’चे प्रकाशन गुरुवारी शासकीय विश्रामगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध उद्योजक विपुलभाई शहा, ज्येष्ठ विचारवंत प्रा. यशवंत पाटणे, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले,
वृत्तपत्र विक्रेते चंद्रशेखर खांडेकर, ताजुद्दिन आगा, डॉ. संदीप काटे, ‘लोकमत’चे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, आवृत्ती प्रमुख सचिन जवळकोटे उपस्थित होते.
जगाच्या पाठीवर जेथे-जेथे मराठी माणूस आहे, तेथे-तेथे ‘लोकमत’चा दिवाळी अंक पोहोचविण्याची जिद्द स्पृहणीय असल्याचे गौरवोद्गार
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकणाऱ्या मजकुरामुळे ‘लोकमत’चा अंक लोकांना वास्तवदर्शी आणि संग्राह्य वाटतो.’
दरम्यान, सर्किट हाऊस येथे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्तेही दीपोत्सव अंकाचे प्रकाशन झाले. यावेळी आमदार शंभूराज देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, हरणाई सूतगिरणीचे रणजितसिंह देशमुख, आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. थोर स्वातंत्र्यसेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. (प्रतिनिधी)

Web Title: 'Lokmat' journalism is trustworthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.