शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुर्गम भागात प्रशासनाची हायटेक तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:01 IST

जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग दुर्गम आहे. पाटण, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यांतील अनेक गावांत मोबाईलला रेंज मिळत नाही, लोकसभा निवडणुकीच्या

सातारा : जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग दुर्गम आहे. पाटण, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यांतील अनेक गावांत मोबाईलला रेंज मिळत नाही, लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, हे ओळखून निवडणूक विभागाने दुर्गम भागात हायटेक तयारी केली आहे.

सातारा लोकसभा मतदार संघाचा पश्चिम भाग अत्यंत दुर्गम आहे. जंगलव्याप्त असणाºया या परिसरात मोबाईलला रेंज मिळत नाही. सुगम भागाशी संपर्कही साधणे कठीण असते. लोकसभा निवडणुकीचे मतदान २३ एप्रिल रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, प्रशासनात सुसूत्रता कायम राहावी, या उद्देशाने प्रशासनाने पावले उचलली आहेत.

जावळी तालुक्यातील देवळीमुरा, उत्तरेश्वर या गावांमध्ये बीएसएनलच्या माध्यमातून मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. या भागात ड्यूटी लागलेल्या कर्मचाºयांना बीएसएनएलचे सीम कार्ड घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण ५५ गावांमध्ये वायरलेस यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. पाटण तालुक्यातील १८, महाबळेश्वर तालुक्यातील २७ व जावळी तालुक्यातील १० गावांमध्ये वायरलेस यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. पोलीस अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी, तहसीलदार यांच्यासाठी वॉकी टॉकी देण्यात येणार आहे. 

ही सर्व यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येणार असली तरीसुद्धा अधिकची दक्षता म्हणून वाहनधारी रनर्सची नेमणूकही करण्यात येणार आहे. ऐनवेळी सर्व यंत्रणा कोलमडली तरी दुचाकीवरून सर्व निरोप जवळचे पोलीस स्टेशन व तहसीलदार कार्यालयाला पोहोचवता येणार आहेत. मोबाईल टॉवरचे टेस्टिंग रिपोर्ट मिळाल्यानंतर खºया अर्थाने ही सर्व यंत्रणा किती उपयोगाची आहे, याबाबत अंदाज बांधणे सोपे जाणार आहे. दोन टॉवरची उभारणी; संपर्कात अडचणी येऊ नये म्हणून सतर्कता 

 

मतदानादिवशी दुर्गम भागात अडचणी टाळण्यासाठी निवडणूक विभागाने ही सतर्कता बाळगली आहे. दुर्गम भागात कार्यरत असणाºया निवडणूक अधिकारी, कर्मचाºयांना वॉकी टॉकीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.-रेखा सोळंकी,  नोडल आॅफीसर निवडणूक

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsatara-pcसातारा