Lok Sabha Election 2019 चंद्रकांतदादांच्या गोपनीय बैठका ,साताऱ्यातील नागरिकांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:07 IST2019-03-28T23:05:29+5:302019-03-28T23:07:43+5:30
सातारा : सातारा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरीही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सूचना केली असून, ...

सातारा येथे बुधवारी रात्री मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या घरी भेट दिली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सातारा : सातारा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरीही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सूचना केली असून, बुधवारी रात्री तर त्यांनी दोन-तीन गोपनीय बैठकाही घेतल्या. तसेच भाजपच्या नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या घरी भेट देत नागरिकांशीही संवाद साधला.
सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी साताºयात झाली होती. या बैठकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन करताना या दोन्ही बालेकिल्ल्यांना खिंडार पाडा, केंद्रात भाजपचेच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांना युतीचाच उमेदवार निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली. साताºयातील उमदेवार शिवसेनेचा असलातरी पदाधिकाऱ्यांनी स्वत: उमेदवार असल्याचे ठरवून काम करण्यास सांगितले होते. त्यानंतर मंत्री पाटील यांनी रात्रीच्या सुमारासच साताºयातील भाजपचे नगरसेवक असणाºया धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे, सागर पावशे, आशा पंडित, सिद्धी पवार, प्राची शहाणे यांच्या घरी भेट दिली. यादरम्यान त्यांनी नागरिकांशीही संवाद साधला. यावेळी विक्रम पावसकर व दत्ताजी थोरात उपस्थित होते.
‘खासदार हा लोकसभेत लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी असतो; पण साताºयात तसे होताना दिसून येत नाही. याचा विचार आता नागरिकांनीच करण्याची गरज आहे,’ असे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, मंत्री पाटील यांनी रात्रीच्या सुमारासच साताºयात दोन-तीन ठिकाणी गोपनीय बैठकाही घेतल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत ते कोणाशी बोलले, काय चर्चा केली? याचे स्पष्टीकरण देण्यास भाजप पदाधिकाºयांनी नकार दिला.