शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

Lok Sabha Election 2019 राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला युतीच्या टकरा : सतत प्रयत्न करूनही एकदाच यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:52 IST

सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला जिंकून घेण्यासाठी भाजप-शिवसेना-रिपाइं यांच्या महायुतीने सातत्याने टकरा दिल्या

ठळक मुद्देयंदा मोठी खलबते झाल्यानंतर नरेंद्र पाटील यांच्या गळ्यात युतीची माळ

सागर गुजर।सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला जिंकून घेण्यासाठी भाजप-शिवसेना-रिपाइं यांच्या महायुतीने सातत्याने टकरा दिल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत तर युती नियोजनबद्धपणे उतरलेली पाहायला मिळते.

भाजप-शिवसेना युतीने काहीही करून सातारा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न केले. गेल्या दोन निवडणुकांत खासदार उदयनराजे भोसले हे या मतदार संघात मोठ्या फरकाने निवडून येत आहेत, तसेच त्यांच्या वलयाचा फायदा उठवून महाराष्ट्रभर युतीचा दिंडोरा पिटण्याचा भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांचा मानस होता. उदयनराजे हाताला लागतायत का? यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मधल्या काळात चांगलीच साखरपेरणी केली होती.

‘राजेंनी काही मागण्याआधीच आम्ही देणार,’ असं सांगत त्यांनी उदयनराजेंचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. सातत्याने सातारा जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरीही लावली होती; परंतु तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे उदयनराजे युतीच्या हाती लागले नाहीत.राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन भाजप सरकारवर आसूड ओढणाऱ्या उदयनराजेंविरोधात उमेदवार देताना युतीने मोठा विचारविनिमय केला. उदयनराजेंविरोधात माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना युतीने शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली आहे. यंदाची निवडणूक युती मागच्याप्रमाणे ‘लाईटली’ घेणार नाही, हेच आता स्पष्टपणे दिसते. २00९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी-काँगे्रसने ६५.२२ टक्के मते घेतली होती. २0१४ च्या निवडणुकीत ५३.५0 टक्के मिळवली होती.उदयनराजे - नरेंद्र यांच्यात टक्कर  राष्ट्रवादीचा भक्कम किल्ला२00९ मध्ये उदयनराजेंनी दबावतंत्र वापरून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली होती. सलग दोन निवडणुकांत ते विजयी ठरले.गेल्या दोन निवडणुकांत राष्ट्रवादीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे.यंदा शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचे मोठे आव्हान उदयनराजे भोसले यांच्यापुढे आहे. राष्ट्रवादी-काँगे्रस विरोधात भाजप-शिवसेना अशीच ही लढत ठरणार आहे.

 

टॅग्स :satara-pcसाताराElectionनिवडणूकPoliticsराजकारण