माणिक डोंगरे मलकापूर (जि.सातारा) : मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपचा करिष्मा झाला. नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपचे उमेदवार तेजस सोनवले यांनी ५ हजार २७७ मतांच्या फरकाने दणदणीत विजयी मिळवला. तर १८ नगरसेवक निवडून आले आहेत. निकालानंतर समर्थकांनी डीजेसह जेसीबीच्या साह्याने गुलालाची उधळण करत जल्लोष केला. समविचारी पक्षाच्या विरोधी आघाडीला केवळ चार जागांवर विजय मिळवता आला.मतमोजणीला आज, रविवारी सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. नगराध्यक्षपदाचे उमेदवार तेजस सोनवले यांना एकूण १० हजार ७४९ मते मिळाली. तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आर्यन कांबळे यांना ५ हजार ४७२, तर शिवसेना शिंदे गटाचे अक्षय मोहिते यांना ७०४ मते मिळाली. तर, नगराध्यक्ष पदासह १८ नगरसेवक भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडून आल्याने मलकापुरात कमळ फुलले. निवडणुकीआधीच सहा जणांची बिनविरोध निवड झाली होती.विरोधी समविचारी पक्ष्यांच्या आघाडीला राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन जागा, उद्धवसेनेच्या एक जागा व अपक्ष एक अशा चार जागांवर विजय मिळवता आला. या निवडणुकीच्या निकालावरून मलकापूर पालिकेवर कमळ फुलवण्यात आमदार डॉ. अतुल भोसले यांना यश प्राप्त झाले आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी शहरात जल्लोष केला.
Web Summary : BJP triumphs in Malkapur! Tejas Sonawale wins the mayoral race by a significant margin with 18 councilors elected. Celebrations erupted as supporters rejoiced. The opposition secured only four seats, marking a major win for MLA Atul Bhosale.
Web Summary : मलकापुर में भाजपा की जीत! तेजस सोनवले 18 पार्षदों के साथ मेयर पद की दौड़ में महत्वपूर्ण अंतर से जीते। समर्थकों ने जश्न मनाया। विपक्ष को केवल चार सीटें मिलीं, जो विधायक अतुल भोसले के लिए एक बड़ी जीत है।