शेततळ्यात पाच दिवस अडकलेल्या नागाला जीवदान
By Admin | Updated: July 11, 2017 14:30 IST2017-07-11T14:30:45+5:302017-07-11T14:30:45+5:30
बांबूच्या मदतीने बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी सोडले

शेततळ्यात पाच दिवस अडकलेल्या नागाला जीवदान
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. १0 : घोरपडीचा पाठलाग करत असताना शेततळ्यात गेलेल्या नागाला प्लास्टिक कागदामुळे बाहेर पडता येत नव्हते. पाच दिवस आतच अडकून राहिलेल्या या नाकाला सर्पमित्रांनी बाहेर काढून जीवदान दिले.
याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यातील एनकूळ येथे बापूराव हांगे यांच्या शेतात मोठे शेततळे केले आहे. तळ्यातील पाणी जमिनीत झिरपू नये म्हणून प्लास्टिक कागद अंथरला आहे. या शेतात पाच दिवसांपूर्वी घोरपडीचा पाठलाग करत असताना एक नाग चुकून शेततळ्यात गेला.
सापाना पोहोत बाहेर येण्याचा खूप प्रयत्न केला. पण प्लास्टिक कागदामुळे घसरुन तो पुन्हा पुन्हा आत जात होता. हा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आला असता त्यांनी सर्पमित्र दादा गुजले यांना ही माहिती दिली.
गुजले यांनी दोर कंबरेला बांधून आत उतरुन नागाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण धोकादायक असल्याने बांबूच्या मदतीने नागाला बाहेर काढले. त्यानंतर त्याला अज्ञात ठिकाणी सुरक्षितपणे सोडले.
सोडण्यापूर्वी न्याहरीची सोय
शेततळ्यात अडकलेल्या सापाला पाच-सहा दिवसांपासून काहीही खायला मिळाले नव्हते. त्यामुळे या नागाला सर्पमित्रांनी बेडकी खायला दिली. त्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी सोडल्याची माहिती इंद्रजित बडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.